|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत दत्त इंडिया (वसंतदादा) कारखान्याच्या ट्रक्टरची हवा सोडली

सांगलीत दत्त इंडिया (वसंतदादा) कारखान्याच्या ट्रक्टरची हवा सोडली 

प्रतिनिधी/ सांगली

सांगलीवाडी मधून ऊस भरुन श्री दत्त इंडिया (वसंतदादा) साखर कारखान्याकडे निघालेला ट्रक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रोखला. ट्रक्टरच्या चाकामधील हवा सोडण्यात आली. बायपास रस्त्यावरील शिवशंभो चौकात रात्री साडे सात वाजता संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱयानंतरही दर न जाहीर करता कारखान्यांनी गाळपास सुरूवात केली आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. दोन दिवसांपासून ऊस तोड बंद ठेवण्याचे आवाहन संघटनेकडून शेतकऱयांना करण्यात येत आहे. तरीही काही शेतकरी कारखानदारांच्या प्रेमापोटी ऊसतोड घेत कारखान्याना ऊस घालत आहेत. दिवसा कार्यकर्ते आंदोलन करतात म्हणून दिवसभर उसाची तोड करायची आणि रात्री वाहतूक करायची असा फंडा काही शेतकरी व कारखानदारांनी सुरु केला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे कारखानदारांच्या हालचालीवर लक्ष आहे. बुधवारी रात्री साडे सात वाजता बायपास रोडवरुन नवीन पुलावरून श्री दत्त इंडियाकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक्टर स्वाभिमानीच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी शिवशंभो चौकात अडवला. ट्रक्टरच्या चाकांतील हवा सोडण्यात आली.

दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड व वाहतूक करायची नाही, असा सज्जड दमच कार्यकर्त्यांनी ट्रक्टर चालकाला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी †िदला. अचानक आंदोलन झाल्याने ट्रक्टर चालकही भेदरुन गेला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळावरुन पलायन केले.

Related posts: