|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पलूसमध्येही उसतोड रोखली

पलूसमध्येही उसतोड रोखली 

पलूस

 उसाला पहिली उचल 3400 रूपये मिळाल्याशिवाय ऊसाचे कांडे तोडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी पलुस येथील उसतोड रोखली. जेवढा ऊस तोडला आहे तो न्या परंतु बाकीच्या उभ्या उसाला धक्का लावलात याद राखा, असा सज्जड दम येथील आक्रमक कार्यकर्त्यानी उस तोडणी मजुरांना दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटचे उपाध्यक्ष पोपट अण्णा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सुमारे आठ ते दहा कार्यकर्त्यानी एकत्र येवून येथील गावतळयाजवळील उसतोड रोखली. दत्त इंडिया (वसंतदादा) सहकारी साखर कारखान्याकडे नेण्यासाठी उसतोड सुरू असल्याचे समजताज संघटनेच्या कार्यकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेत धाव घेतली.

पोपट मोरे म्हणाले, खा. राजू शेट्टी यांच्या जयसिंगपूर येथील उस परिषदेत शेतकऱयांच्या उसाला पहिली उचल 3400 रूपये जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू होवू दयायचा नाही, असा ठराव झाला असताना डॉ. निकम या शेतकऱयास अमिष दाखवून उस तोडून नेण्याचा प्रकार सुरू होता. तो आज आम्ही हाणून पाडला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू पाटील, प्रकाश फाळके, संजय माळी, अमोल मोरे, सुरेंद्र येसुगडे, भालेखान यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: