|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेने लावला पालकमंत्र्यांच्या आदेशाला कोलदांडा

पालिकेने लावला पालकमंत्र्यांच्या आदेशाला कोलदांडा 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहर ऐतिहासिक असले तरी अगोदरच विकासापासून वंचित राहिले आहे. पालिकेचा एकमेव असलेला पोहण्याचा तलाव सुरु करण्याबाबत चक्क पालकमंत्री विजयबापु शिवतारे यांनी पालिका प्रशासनाला तोंडी आदेश दिले होते. परंतु पालिका प्रशासनाकडून पालकमंत्र्यांच्या आदेशाला कोलदांडा दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू लागली आहे. पालिकेने हा तलावच भंगारात काढला आहे. काही दिवसांनी या तलावातील फिल्टरेशन यंत्रणा व इतर साहित्यही कवडीमोल भावाने विकल्या जातील अशी भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या पालिकेच्या पोहण्याच्या तलावाला नगरसेवक स्व. गोपाळबापू औताडे यांचे नाव दिले आहे. त्यामुळे त्यांचीही फसवणूकच केल्याची चर्चा सुरु आहे.

सातारा पालिकेला भेट देवून पालिकेच्या चाललेल्या कामाचा आढावा घेणारे पालकमंत्री विजय शिवतारे हे एकमेव. त्यांनी दि.1 जुलैला ही बैठक पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात घेतली होती. काही नागरिकांनी त्यांच्यासमोर पालिकेचा पोहण्याचा तलाव बंद असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे पालकमंत्री शिवतारे यांनी पोहण्याचा तलाव सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आदेश मिळताच पालिका प्रशासनाने केवळ ‘मान’ डोलवण्याची कार्यवाही केली. त्यानंतर गणेशोत्सव झाला. दुर्गाउत्सव झाला पालिका प्रशासनाकडून केवळ गणेश मूर्ती विसर्जनावेळी हा तलाव खुला केला होता. सातारा शहरात अनेक स्वीमर घडत आहेत. स्नेहल कदम हिच्यासारखी जलतरणपट्टू साताऱयातून घडू लागल्या असताना अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व सरावासाठी खाजगी तलाव आहेत. शासकीय क्रीडा संकुलात पोहण्याचा तलाव आहे. परंतु त्याचीही फी अवाच्या सवा आहे. त्या तलावाकडे गर्भश्रीमंत वर्गच फिरकतो. तसेच खाजगी एक ते दोन तलाव आहेत. गरीबांच्या खिशाला परवडेल असा केवळ पालिकेचाच तलाव होता तोही तलाव पालिकेने बंद केला आहे. आता तो तलाव भंगारात काढण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्या तलावातील फिल्टरेशन यंत्रणा व इतर साहित्य कवडीमोल भावाने विकले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कर्तव्यदक्ष नगरसेवक स्व.गोपाळबापू औताडे यांचे नाव त्या तलावाला दिले गेले खरे परंतु हा तलावच बंद असल्याने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पालिकेकडून फसवणूकच सुर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Related posts: