|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » गुजरातमध्ये निवडणुकानंतर पद्मावती चित्रपट प्रदर्शित करा ; भाजपाची मागणी

गुजरातमध्ये निवडणुकानंतर पद्मावती चित्रपट प्रदर्शित करा ; भाजपाची मागणी 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱय पद्मावती चित्रपटाला गुजरातमध्ये भाजपाने विरोध केला आहे. गुजरात निवडणुकानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी भाजपाने केली आहे. पद्मावती सिनेमा गुजरात निवडणुकीनंतर गुजरातमध्ये प्रदर्शित करा किंवा सिनेमाला बॅन करा, असे मत भाजपाचे प्रवक्ते आय. के. जडेजा यांनी केला आहे.

पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी तो राजपूत प्रतिनिधींना दाखवला जावा, अशी मागणी भाजपाने निवडणूक आयोग आणि गुजरात मुख्य निवडणूक आयोगच्या आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. राजपूत प्रतिनिधींना सिनेमा दाखविला तर सिनेमावरील त्यांचा रेष कमी होईल तसेच आगामी गुजरात निवडणुकांच्यावेळी कुठलीही तणावपूर्ण परिस्थिती उद्भवणार नाही, असे गुजरात भाजपाने पत्रात म्हटले आहे.