|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » विविधा » महिलांसाठी गोवा सर्वाधिक सुरक्षित तर दिल्ली बदनाम

महिलांसाठी गोवा सर्वाधिक सुरक्षित तर दिल्ली बदनाम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतात महिलांसाठी गोवा सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि नवी दिल्लीत महिला सर्वाधिक असुरक्षित असल्याचे एका सर्व्हेतून उघड झाला आहे.

शिक्षण , आरोग्य, गरिबी आणि हिंसा या चार कारणांनी महिलांना कराव्या लागणाऱया संघर्षावर हा सर्व्हे आधारित आहे. ‘प्लान इंडिया’ने हा अहवाल तयार केला असून त्याला केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे. या अहवालात गोव्यापाठोपाठ, केरळ, मिझोराम, सिक्कीम आणि मणिपूर महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य असल्याचे म्हटले आहे. गोवा महिलांच्या सुरक्षेत अव्वल असला तरी शिक्षण आणि आरोग्यात पाचव्या आणि गरिबीत आठच्या स्थानावर असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

Related posts: