|Thursday, April 19, 2018
You are here: Home » Top News » उद्धव-ममता बॅनर्जी ही केवळ सदिच्छा भेट : शिवसेना

उद्धव-ममता बॅनर्जी ही केवळ सदिच्छा भेट : शिवसेना 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात केवळ सदिच्छा भेट झाली असून, या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले.

याभेटीदरम्यान युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुंबई दौऱयावर येण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. ममता बॅनर्जी यांनी नियोजित कार्यक्रमानुसार गुरुवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात होते. त्यावर अखेर शिवसेनेने स्पष्टीकरण देत, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले.

Related posts: