|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कमल हसनच्या तोंडी हफीज सईदची भाषा

कमल हसनच्या तोंडी हफीज सईदची भाषा 

नवी दिल्ली /वृत्तसंस्था :

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांची भाषा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद सारखाच आहे, अशी बोचरी टीका गुरूवारी भाजपच्या वतीने करण्यात आली. हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला आहे, अशी टीका कमल हसन यांनी आनंदा विकटन या तामिळ साप्ताहिकामधील लेखातून केली होती. त्याला उत्तर देताना भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 

  अलिकडे हिंदू समुदायाला बदनाम करण्याची फॅशन आली आहे. आजवर
काँग्रेसने केवळ मुस्लिम व्होट बँकेचे राजकारण केले. त्यामुळेच त्यांचे नेते पी. चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे हे हिंदू दहशतवाद्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत. आता यामध्ये कमल हसन यांची भर पडली असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहाराव यांनी सांगितले. कमल हसन हे पी. चिदंबरम आणि पाकिस्तानमधील दहशतवादी हाफिज सईद याचीच भाषा बोलत आहे. त्यांची विधान पाकिस्तानलाच मदत करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

 पूर्वीच्या काळात हिंदू चर्चा करण्यासाठी तयार असत. मात्र अलिकडे त्यांचा हिंसेत सहभाग वाढत आहे, असेही कमल हसन यांनी आपल्या लेखात म्हटले होते. तसेच केरळमधील डाव्या पक्षाचे सरकारने तामिळनाडूपेक्षाही चांगल्या पद्धतीने धार्मिक हिंसाचाराचा प्रश्न हाताळल्याचे त्यांनी म्हटले आहे.