|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » कारकिर्दीत प्रथमच के.श्रीकांत दुसऱया स्थानी

कारकिर्दीत प्रथमच के.श्रीकांत दुसऱया स्थानी 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

हंगामात सर्वोत्तम बहरात असलेल्या आघाडीचा भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या बॅडमिंटन क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान संपादन केले. यंदा पाचवेळा फायनल गाठणाऱया आणि तब्बल 4 सुपरसिरीज जिंकणाऱया श्रीकांतच्या खात्यावर सध्या 73403 गुण असून डेन्मार्कचा वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर ऍक्झेल्सेनपेक्षा तो 4527 गुणांनी पिछाडीवर आहे. मूळ गुंटूरचा असलेल्या श्रीकांतला यानंतर चीन व हाँगकाँगमधील स्पर्धांत भरीव कामगिरी केल्यास अव्वलस्थानी विराजमान होण्याची संधी असेल.

Related posts: