|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महापौर आणि नगरसेवकांवर कारवाईच्या चर्चेला उत

महापौर आणि नगरसेवकांवर कारवाईच्या चर्चेला उत 

प्रतिनिधी /बेळगाव :

महापौर संज्योत बांदेकर व नगरसेवक काळयादिनाच्या फेरीत सहभागी झाले होते. यामुळे एकीकडे महापालिका सभागृह बरखास्त करण्याच्या मागणीसाठी बेळगाव शहराबाहेरील कानडी संघटनांच्या म्होरक्मयांनी आटापिटा चालविला आहे. तर दुसरीकडे फेरीत सहभागी होवून राज्यद्रोह केला असल्याबद्दल महापौर आणि नगरसेवकांना निलंबित करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार केद्रशासनाच्या विरोधात छेडलेले आंदोलन राज्य द्रोह कसे झाले असा मुद्दा उपस्थित झाला.

दि.1 नोव्हेबर रोजीच्या काळयादिनाच्या फेरीत महापौर-नगरसेवक मोठया संख्येने सहभागी झाले होते. तसेच फेरीत मराठी भाषिक जनता मोठया संख्येने सहभागी झाली होती. पण मराठी भाषिकांची एकी कानडी संघटनाना पोटदुखी बनली आहे. यामुळे महापौर-नगरसेवकावर कारवाई करण्यासह महापालिका सभागृह बरखास्त करण्याची मागणी करीत कानडी संघटनांनी दबावतंत्राचा वापर चालविला आहे. राज्यद्रोहाचा ठपका ठेवून महापौर व फेरीत सहभागी झालेल्या नगरसेवकांचे सदस्यपद रद्द करण्यात येणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. तसेच राज्यद्रोह करणाऱया नगरसेवकांना आगामी काळात निवडणूक लढविता येवू नये अशी तरतूद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts: