|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » Top News » ओला कॅब चालकांना लुटणारी टोळी अटकेत

ओला कॅब चालकांना लुटणारी टोळी अटकेत 

ऑनलाईन टीम / कल्याण :

पॉकेटमनीसाठी ओला कॅब चालकांना लुटणारी युवकांच्या टोळीला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. लुटमारी करणारी कॉलेज तरूणांची ही 9 जणांची टोळी आहे. यामध्ये मंत्रालयात काम करणाऱया अधिकाऱयाच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी 9 पैकी चार जणांना अटक केली आहे. उर्वरित पाच जणांचा शोध सुरू आहे. या टोळीतील चोरटी ही 18 ते 25 या वयोगटातील आहेत. ओला कॅब ड्रायव्हर हे या टोळीचे प्रमुख लक्ष्य होते. ओला कॅब चालकाला एखाद्या ठिकाणी बोलावून त्याला लुटायचे आणि कॅब घेऊन पळून जायचे, असा या टोळीचा धंदा होता. या टोळीने एक तारखेला रात्री तीन ओला डायव्हर्ससह एकूण चार जणांना लुटले आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळे रचून, या चोरटय़ांना अटक केली.

 

 

 

 

Related posts: