|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » बँक दरोडा ; राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत

बँक दरोडा ; राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत 

ऑनलईन टीम / पंढरपूर  :

बँक ऑफ महाराष्ट्राच्या गाडीवर पडलेल्या 70 लाखाच्या दरोडय़ाप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ यांना अटक करण्यात आली आहे. मासाळ यांचा या दरोडय़ाच्या कटात सहभागी असल्याचे समोर आले आहे.

काल रात्री उशिरा मासाळ यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रामेश्वर मासाळ हा जिह्यात अजिप पवार यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. बँकेच्या पैशाची संगनमताने लूट झाल्यानंतर दरोडय़ाचा बनाव रचला गेला होता. या कारणावरून बँक व्यवस्थापक अमोर भोसलें आणि दरोडय़ातील भाऊसाहेब कोळेकर यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. भोसले आणि मसाळे यांचे जवळचे संबंध असल्याने यातूनच ही रोकड लुटण्याचा व तो दरोडा असल्याचे भासवण्याचा कट रचण्यात आला होता.

 

 

 

 

Related posts: