|Monday, October 15, 2018
You are here: Home » उद्योग » भारत ‘चलन साठेबाज’ नाही : राजन

भारत ‘चलन साठेबाज’ नाही : राजन 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आरबीआयचे समर्थन केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी भारताला विदेशी चलनाची आवश्यकता आहे. अमेरिकन अर्थ मंत्रालयाने भारताला चलन साठेबाज समजू नये, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या खनिज तेलाच्या किमती वाढत आहेत. त्या पाहता भारताला विदेशी चलनाची आवश्यकता भासत आहे. भारताची व्यापार तुटीत चालत आहे. देशातील आऊटफ्लो पाहता विदेशी चलनाची गरज भासते. गरजेवेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे धावण्याची गरज भासणार नाही याची काळजी देशाला घ्यावी लागते. तसेच राजकीयदृष्टय़ा विदेशी चलन नसणे धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले. राजन सध्या शिकागो विद्यापीठातील बुथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने भारत विदेशी चलनाचा साठा वाढवित असून आर्थिक धोरणांवर नजर ठेवण्यात येत असल्याचे म्हटले होते.

Related posts: