|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ातील साडेतीन हजार एस.टी.कर्मचाऱयांचे वेतन कापणार

जिल्हय़ातील साडेतीन हजार एस.टी.कर्मचाऱयांचे वेतन कापणार 

चार दिवसाचे वेतन टप्याटप्याने कापणार

कर्मचाऱयांना झळ पोहचू नये म्हणून निर्णय

रत्नागिरी विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के

प्रतिनिधी /रत्नागिरी

ऐन दिवाळीत एस. टी. कर्मचाऱयांनी केलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांची 4 दिवसांची वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फटका जिल्ह्य़ातील सुमारे 3500 एस. टी. कर्मचाऱयांना बसणार आहे. मात्र कोणत्याही कर्मचाऱयाला मोठी आर्थिक झळ बसू नये यासाठी ही वेतन कपात एकाच महिन्यात न करता प्रत्येक महिन्यात एक दिवस अशी चार महिन्यात केली जाणार आह. महामंडळाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार कपात करण्याचा किंवा संपकाळातील चार दिवसांसाठी आठ दिवसांची रजा समर्पित केल्यास पगार कपात न करण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला होता. मात्र त्याबाबतचे परिपत्रक गुरूवारी काढण्यात आले नव्हते त्यामुळे कर्मचाऱयांनी अर्जित रजा समर्पित केलेल्या नाहीत. परिणामी त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारातून एकदाच चार दिवसाचा पगार न कापता चार महिन्यात चार दिवसाचा पगार कापण्याच्या सूचना एस. टी. महामंडळाने प्रत्येक विभागाला दिल्या आहेत.

त्यानुसार रत्नागिरी विभागही अंमलबजावणी करणार असून येत्या चार महिन्यात कर्मचाऱयांचा चार दिवसाचा पगार कापला जाणार आहे. एस. टी. महामंडळाने पगार कपातीची कारवाई करतानाही कर्मचाऱयांच्या हिताचा विचार करून त्यावर पर्याय काढल्याने कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related posts: