|Monday, December 10, 2018
You are here: Home » Top News » फेरीवाल्यांना मारहाण करणे चुकीचे : नाना पाटेकर

फेरीवाल्यांना मारहाण करणे चुकीचे : नाना पाटेकर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे त्यासाठी अन्न मिळवणे महत्त्वाचे असते व त्याकरिता काम करावे लागते. रस्तयांवरील फेरिवाले हे अशा कष्टांपैकी असून, मोलमजुरी करून आपली रोजीरोटी मिळवतात. त्यांना मारहाण करणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शुक्रवारी केले आहे.

माटुंग्याच्या व्हीजेटीआय कॉलेजच्या ‘टेक्नोवन्झा’फेस्टिव्हमध्ये ते बोलत होते. नाना म्हणाले, “मला वाटते फेरिवाल्यांची यात काहीच चुक नाही. फेरीवाले आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी दोन वेळच्या भाकरीसाठी ते काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही. यामध्ये खरेतर आपली चूक आहे, आपण महापालिकेला, प्रशासनाला इतके दिवस फेरीवाल्यांना जागा का दिली नाही?याबाबत का विचरले नाही?म्हणजे याला आपणच जबाबदार आहोत,फेरीवाले नाही’’.

 

 

 

 

Related posts: