|Saturday, February 23, 2019
You are here: Home » Top News » कर्नाटककडून महाराष्ट्राचा धुव्वा, डावाने पराभवाची नामुष्की

कर्नाटककडून महाराष्ट्राचा धुव्वा, डावाने पराभवाची नामुष्की 

 पुणे / प्रतिनिधी  :

पुण्यात गहुंजे मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र विरूद्ध कर्नाटक यांच्यातील रणजी ट्रॉफीचा सामन्याच्या शनिवारी चौथ्या दिवशी कर्नाटकने महाराष्ट्राचा एक डाव आणि 136 धावांनी पराभव केला. दुसऱया डावात 383 धावांची भक्कम आघाडी मिळविल्यानंतर कर्नाटकने महाराष्ट्राला 247 धावांत गारद करत चौथ्या दिवशी सामना आपल्या नावावर केला आहे.

या विजयामुळे ग्रुप ‘ए’ मध्ये कर्नाटकचे 3 सामन्यात 3 विजय मिळवत 20 गुणांसह प्रथम स्थान मिळवले आहे. तर महाराष्ट्राचे 3 सामन्यात 1 विजय 1 परभवासह 7 गुण मिळवले आहेत. गुणतालीकेत महाराष्ट्राची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसऱया डावात कर्नाटकच्या अभिनव मिथूनने 18 षटकात 66 धावा देत 5 गडी रोनित मोरेने 2 आणि स्टुअर्ट बिनी, करूण नायर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. महाराष्ट्राकडून पहिल्या डावात शतक ठोकणारा राहुल त्रिपाठीने 51 धावा, ऋतुराज गायकवाडने 65 तर रोहीत मोटवानीने 49 धावा केल्या. परंतु इतर कोणाला फारकाळ मैदानात ठिकून राहता आले नाही.

कर्नाटकच्या मयांक अगरवालने केलेल्या त्रिशतकी खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मयांक बरोबरच रविकुमार, करूण नायर यांनी देखील या सामन्यात शतकी खेळी केली आहे.

Related posts: