|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

या आठवडय़ात महत्त्वाची कामे सुरुवातीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ग्रहांची साथ चांगली आहे. धंद्याला नवीन दिशा मिळेल. मनाप्रमाणे निर्णय घेता येतील. राजकीय सामाजिक क्षेत्रात वरि÷ आपल्या कामाचे कौतुक करतील. नवीन उपक्रम हाती घ्या व मोठे पाऊले उचलण्यास आता हरकत नाही. कला, क्रीडा, नाटय़, चित्रपट क्षेत्रात कामे मिळतील. शेतीच्या कामात भागीदारी करू नका. फसगत संभवते. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे आठवडय़ाच्या शेवटी संभवतात.


वृषभ

आरोग्याची काळजी घ्या व निर्णय आपल्या मनाने घेऊ नका. चुकतील. हा आठवडा रेंगाळत पडलेल्या कामांना थोडी गती देणारा असणार आहे. आपल्या हातून चांगले  लेखन होण्याची शक्मयता आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात आता जास्त द्यावे लागेल. ग्रहांची फारशी साथ नसल्याने अडचणी येणार आहेत. पण प्रयत्नाने आपण त्यावर मात करू शकाल. कौटुंबिक जीवनात गैरसमज वाद टाळण्याचा प्रयत्न करा. प्रॉपर्टीच्या व्यवहारात सावध रहा.


मिथुन

प्रगतीचा वेग आता वाढणार आहे. कुठल्याही क्षेत्रात आपले वर्चस्व राहिल. मात्र अति लोभीपणा करू नका. समाधानी वृत्ती ठेवल्यास आनंदी रहाल. आठवडय़ाच्या सुरुवातिला नोकरीत थोडे वाद गैरसमज संभवतात.नवनवीन नोकरीच्या शोधात असाल तर आता योग जुळून येतील. लोकसंग्रह वाढविण्याचा प्रयत्न करा. आपले विचार व आपल्या सहकार्याचे विचार दोन्हीची सांगड घालून राजकीय, सामाजिक क्षेत्रात निर्णय घ्या. अचूक ठरेल.


कर्क

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱया व्यक्तींना कामात थोडे जास्त लक्ष द्यावे लागेल. हातून छोटीशी सुद्धा चूक घेता कामा नाही याची काळजी घ्या. खोटे आरोप होण्याची शक्मयता आहे. जीवनसाथीच्या मदतीने काही अवघड कोडे सोडवू शकाल. शेतीच्या कामात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आई वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आध्यात्मिक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा. वेळ फुकट घालवू नका. धंद्यात पैसे उधारीवर देऊ नका. शनिवारी आर्थिक लाभ संभवते.


सिंह

चंद्र, शुक्र त्रिकोण योग व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. लोकांचे प्रेम संपादन करण्याचा प्रयत्न करा. कला क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल. नवीन परिचय उत्साह व आत्मविश्वास देणारे ठरतील. शेतकरी वर्गाला चांगला फायदा होईल. क्षुल्लक वाद करणाऱया लोकांना मात्र दुर्लक्षीत करा. ‘ॐ नम: शिवाय।’ जप करा. धंद्यात वाढ होईल. संसारात चांगल्या घटना घडतील. अविवाहितांना मनाप्रमाणे स्थळे मिळतील. विवाह योग येईल. शिक्षणात प्रगती होईल.


कन्या

चंद्र, बुध, प्रतियुती व मंगळ नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. या सप्ताहात तुमचे मनोबल टिकून राहील. तुम्हाला राग येईल. अशा घटना घडू शकतात. संयम  ठेवा. प्रति÷ा टिकवता येईल. राजकीय- सामाजिक क्षेत्रात पदाधिकारी मिळू शकेल. स्पष्ट व खोचक बोलणे टाळा. प्रेमाची माणसे मदत करतील. कला क्रीडा क्षेत्रात वर्चस्व वाढेल. किरकोळ दुखापत संभवते. कोर्टकेसमध्ये मुद्याचेच बोला. संसारात सुखाचे क्षण येतील. मुलांची प्रगती तुम्हाला सुख देईल. धंद्यात वाढ होईल. शेतकरी प्रगतीच्या दिशेने जाईल.


तूळ

सप्ताहाच्या सुरुवातीला राग वाढेल. तणाव होईल. संयम ठेवा. अंगारक चतुर्थीपासून तुमचे प्रश्न सुटतील. प्रवासात घाई नको. चंद्र, बुध प्रतियुती व सूर्य प्लुटो लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात तुम्ही चौफेर प्रगती करू शकाल. प्रयत्न करा. शेतकरी वर्गाने पूर्वी केलेल्या चुका या वर्षात सुधारता येतील.सुखाचे दिवस तुमच्या मेहनतीने व बुद्धिचातुर्यानेच येतील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. वरि÷ खूष होतील. बेकारांना नोकरी लागेल. शिक्षणात पुढे याल.


वृश्चिक

सूर्य, चंद्र केंद्रयोग व चंद्र, शनि प्रतियुती होत आहे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असलात तरी सावधपणे निर्णय घ्या. कामात लक्ष द्या. एखादी चूक महागात पडेल. शेअर्समध्ये सावधपणे निर्णय घ्या. अंदाज चुकेल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या भानगडीत पडू नका. खर्च होईल. प्रति÷ा कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात कुणालाही दुखवून चालणार नाही. यशासाठी झगडावे लागेल. मंगळवार, बुधवार कोर्टकेसमध्ये काळजीपूर्वक बोला. संसारात मिळते जुळते धोरण ठेवा.


धनु

चंद्र, शुक्र त्रिकोण योग व सूर्य प्लुटो लाभयोग होत आहे. या आठवडय़ात सर्व ठिकाणी जबाबदारी वाढेल. कामाचा व्याप वाढेल. सर्वांनाच तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. धावपळ दगदग होईल. गुप्त कारवाया करणारे लोक  करतील. तुमचे महत्त्व मात्र कमी होणार नाही. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्यावी लागेल. प्रसिद्धी मिळेल. पैसा मिळेल. नवे मित्र मिळतील. संसारात जवळच्या व्यक्तींचा आधार मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. विवाह योग जुळेल. शिक्षणात प्रगती होईल.


मकर

 चंद्र, गुरु त्रिकोणयोग व चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. साडेसाती सुरू आहे. मंगळवार, बुधवार मनस्ताप व वाद होईल. राजकीय- सामाजिक कार्यात उत्साह व आत्मविश्वासाने काम करता येईल. लोकांची मने जिंकता येतील. दौऱयात यश मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. कोर्टकेसमध्ये मदत घेता येईल. थोरा मोठय़ांचे सहकार्य मिळेल. ओळखी होतील. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार, मान, सन्मान व आर्थिक लाभ मिळेल. संसारात कौटुंबिक सुख मिळेल. शिक्षणात जिद्द ठेवा यश मिळेल.


कुंभ

चंद्र, बुध प्रतियुती व चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. शेतकरी वर्गाला स्वत:च्या हिमतीवर, हुशारीवर मोठे यश मिळवता येईल. फुले, फळे, यामध्ये फायदा होईल. नवी ओळख फायदेशीर ठरेल. संसारात सुखाचे वातावरण राहील. नवी संकल्पना उपयुक्त ठरेल. प्रसिद्धी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात पुढे जाता येतील. योजना पूर्ण करता येतील. कोर्टकेस संपवता येऊ शकते. गुरुवार, शुक्रवार अडचणी येतील. कला, क्रीडाक्षेत्रात यश मिळेल. किरकोळ दुखापत होऊ शकते. वाहन जपून चालवा.


मीन

 व्यवसायात मोठी कामे येतील. मात्र विचारपूर्वक पाऊले उचला. घाई करू नका. आर्थिक काम होणार आहे. मंगळवार, बुधवार, नोकरीत कामात अडचणी निर्माण होतील. वरि÷ांबरोबर वाद गैरसमज संभवतात. शांतपणे प्रकरणे हाताळण्याचा प्रयत्न करा. शेतकरी वर्गाने अधिक कष्ट घेतले तरच यश मिळेल. वाहन  जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपले विचार लोकांना आता पटणार नाहीत. त्यामुळे थोडी चिडचिड होईल. प्रकृतीची  थोडी काळजी घ्या.