|Saturday, October 20, 2018
You are here: Home » क्रिडा » पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून नदालची माघार

पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून नदालची माघार 

वृत्तसंस्था / पॅरीस

येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरूषांच्या पॅरीस मास्टर्स टेनिस स्पर्धेतून स्पेनचा टॉप सीडेड टेनिसपटू राफेल नदालने दुखापतीमुळे माघार घेतली. शुक्रवारी नदालने या स्पर्धेतील आपला उपांत्यपूर्व फेरीचा सामना सोडल्याने सर्बियाच्या क्रेजीनोव्हिकला पुढे चाल मिळाली आहे.

नदालला उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याला वेदना जाणवत आहेत. ही दुखापत अधिक चिघळू नये याची खबरदारी घेत नदालने या स्पर्धेतून माघार घेतली. लंडनमध्ये 12 ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया एटीपी टूर अंतिम स्पर्धेपूर्वी आपण पूर्ण तंदुरूस्त राहू, असा विश्वास 31 वर्षीय नदालने व्यक्त केला आहे. नदालला आतापर्यंत एकदाही पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नसून यंदाही त्याची संधी दुखापतीमुळे हुकली आहे.

Related posts: