|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कुटरेत बिबटय़ाची गोळी घालून शिकार?

कुटरेत बिबटय़ाची गोळी घालून शिकार? 

वार्ताहर/ सावर्डे

चिपळूण तालुक्यातील कुटरे गावी जांभा याठिकाणी खैरवाडी पुनर्वसनजवळील गडनदी प्रकल्पाच्या कालव्याजवळ मानेला गोळी लागलेला मृत बिबटय़ा कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे.

याबाबत कुटरेचे पोलीस पाटील साळुंखे यांनी वनाधिकारी व सावर्डे पोलिसांना खबर दिली. चिपळूणचे वनक्षेत्रपाल सचिन निलक, उमेश आखाडे, नांदगावचे वनरक्षक निरा गोरखे यांनी घटनास्थळी भेट देऊन याचा पंचनामा केला. या बिबटय़ाची दोन किंवा तीन दिवसांपूर्वी शिकार झाली असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.

दरम्यान, या बिबटय़ाचे शवविच्छेदन चिपळूण येथील पशुसंवर्धनचे डॉ. सुपले यांनी केले. त्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार या बिबटय़ाच्या पोटाच्या भागाला जोरदार मार बसला असून यातच तो गतप्राण झाल्याचे म्हटले आहे. तसेच जंगली प्राण्याच्या झटापटीत किंवा तो दरीत पडून गंभीर जखमी झाला असावा आणि त्यातच तो गतप्राण झाल्याचे म्हटले आहे. मात्र या बिबटय़ाचा मृत्यू बंदुकीची गोळी लागून झालेला नसल्याचे डॉ. सुपले यांनी शवविच्छेदन अहवालात स्पष्ट केले आहे.

 

Related posts: