|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विष्णू सुर्या वाघ यांच्यावर ‘सोशल मिडीया’ द्वारा होणारी बदनामी चूकीची- अनिल होबळे

विष्णू सुर्या वाघ यांच्यावर ‘सोशल मिडीया’ द्वारा होणारी बदनामी चूकीची- अनिल होबळे 

प्रतिनिधी/ पणजी

लेखक विष्णू सुर्या वाघ यांच्या ‘सुदीरसुक्त’ या कविता संग्रहावर एफआयआर नोंद केल्यानंतर या पुस्तकाची व त्यांची बदनामी सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत आहे. हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्यामुळे या एफआयआर ची दखल घेऊन लवकारात वाघ यांना न्याय मिळवून द्यावा व हा विषय संपवावा असे, गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी सांगितले.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत होबळे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत गोमंतक भंडारी समाजाचे सचिव उपेंद्र गावकर, अशोक नायक, देवानंद नाईक, संध्या पालयेकर, व इतर मान्यवर उपस्थित होते.

या पुस्तकाचे प्रकाशन होऊन 4 वर्षे झाली. त्यावेळी का कुणी आक्षेप घेतला नाही. आता जेव्हा हे पुस्तक पुरस्काराच्या शर्यतीत आहे याचवेळी कवितेच्या भाषेवरुन आक्षेप का घेतला जातो. याआधी विविध गोमंतकीय लेखकांनी अशाप्रकारची भाषा वापरलेली आहे. मग वाघ यांच्या लेखणीवर अन्याय का केला जातो. असा प्रश्न यावेळी होबळे यांनी उपस्थित केला.

आवडा व्हिएगस यांनी एफआयआर नोंद करण्यापूर्वी यापुस्तकाबद्दल पूर्ण माहीती घेणे आवश्यक होते. त्यांनी जे काही केले ते चूकीचे आहे. त्यामुळे व्हिएगस यांचा आम्ही निषेध करत आहोत. वाघ यांनी या कवितांमध्ये वापरलेली भाषा ही स्थानिक भाषा आहे. आजही ग्रामिण भागात किंवा इतर ठिकाणी अशाप्रकारची भाषा वापरले जाते. यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही असेही होबळे यांनी पूढे सांगितले.

Related posts: