|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘आयसीजीएस सुजय’ गस्ती जहाज भारतीय तटरक्षक दलाकडे सुपूर्द

‘आयसीजीएस सुजय’ गस्ती जहाज भारतीय तटरक्षक दलाकडे सुपूर्द 

भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या सहा जहाजांच्या मालिकेतील शेवटचे जहाज

प्रतिनिधी/ वास्को

‘आयसीजीएस सुजय’ हे अत्याधुनिक अपतटीय गस्ती जहाज गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलाकडे सुपूर्द केले आहे. गोवा शिपयार्डने तटरक्षक दलासाठी बांधलेल्या सहा जहाजांच्या मालिकेतील हे शेवटचे जहाज आहे. गोवा शिपयार्डने नियोजीत वेळेपूर्वीच हे जहाज बांधून तटरक्षक दलाकडे सुपुर्द केले आहे. दोन वर्षात भारतीय तटरक्षक दलाकडे सहा अपतटीय गस्तीजहाजे सुपूर्द करण्यात आली आहेत.

‘आयसीजीएस सुजय’ हे अत्याधुनिक गस्ती जहाज 105 मीटर लांबीचे असून गोवा शिपयार्डमध्येच शनिवारी एका छोटय़ा समारंभात हे जहाज अधिकृतरित्या गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल शेखर मित्तल यांच्याहस्ते भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक कमांडिग ऑफिसर योगिंदर ढाका यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी तटरक्षक दलाचे डीआयजी एच.पी.सिंग, डीआयजी अतुल पार्लीकर, गोवा शिपयार्डचे संचालक एस.पी. रायकर, कमांडर बी.बी. नागपाल, गोवा शिपयार्ड व भारतीय तटरक्षक दलाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

आयसीजीएस सुजय गस्ती जहाज तटरक्षक दलाकडे सुपूर्द केल्यानंतर बोलताना गोवा शिपयार्डचे अध्यक्ष शेखर मित्तल यांनी हे जहाज नियोजीत वेळे आधीच बांधून सुपूर्द करण्यात आल्याचे सांगितले. गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलाकडे आतापर्यंत अशा प्रकारची सहा गस्ती जहाजे बांधुन दलाकडे सुपूर्द केली आहेत. गोवा शिपयार्डने गेल्या पंधरा महिन्यात भारतीय तटरक्षक दलाकडे चार गस्ती जहाजे, भारतीय नौदलासाठी 1 इंधनवाहू बार्ज, मॉरिशससाठी 2 अतिजलद गस्तीजहाजे व श्रीलंकन नौदलासाठी बांधलेले एक गस्ती जहाज सुपूर्द करण्यात आले आहे. पंधरा महिन्यांत विक्रमी कामगीरी शिपयार्डने पार पाडलेली आहे.

गोवा शिपयार्डने तटरक्षक दलासाठी बांधलेल्या सहा जहाजांच्या मालिकेतील सहाही जहाजे नियोजीत वेळेपूर्वीच बांधून तटरक्षक दलाकडे सुपुर्द केली आहेत. या सहा जहाजांच्या मालिकेतील पहिले ‘आयसीजीएस समर्थ’ या अत्याधुनिक अपतटीय गस्ती जहाजाचे 10 नोव्हेंबर 2015 रोजी तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते प्रवर्तीकरण करण्यात आले होते. दोन वर्षात भारतीय तटरक्षक दलाकडे सहा अपतटीय गस्तीजहाजे सुपूर्द करण्यात आली आहेत.

Related posts: