|Sunday, October 21, 2018
You are here: Home » Top News » सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव 

ऑनलाईन टीम / नागपूर :

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे विद्यापीठाच्या नामांतराच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे.

धनगर समाज आयोजित एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या मुद्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. यासाठी दोन गटांची विविध मागणी होती. यातील एक गट अहिल्याबाई होळकरांच्या नावासाठी तर दुसऱया गटाकडून महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, आज अखेर मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

Related posts: