|Sunday, July 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » हुंटाश चित्रपटात धमाल कॉमेडी

हुंटाश चित्रपटात धमाल कॉमेडी 

हुंटाश ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन नक्षत्र मुव्हीज प्रस्तुत आणि अपर्णा प्रमोद, अच्युत नावलेकर निर्मित आणि अंकुश ठाकूर दिग्दर्शित लवकरच धमाल मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या निखळ मनोरंजन करणाऱया आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱया चित्रपटात ठसकेबाज अभिनेत्री उषा नाडकर्णी, दमदार अभिनेते अरुण नलावडे तसेच कॉमेडी किंग विजय चव्हाण आणि किशोर नांदलस्कर यांच्यासोबत सुप्रसिद्ध संजीवनी जाधव तसेच नीला गोखले या उत्तम अभिनेत्री आपणास पाहायला मिळणार आहेत. तसेच यांच्यासोबत नवोदित अभिनेत्री प्रियंका पूळेकर हिने या चित्रपटात चांगले व्यक्तिमत्व साकारले आहे. तसेच अंकुश ठाकुर या अभिनेत्याने प्रियंकाला भक्कम साथ देत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सर्व कलाकारांनी चित्रपटात अपार मेहनत घेऊन कथेला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. या विनोदी चित्रपटात तरूणाईला भुरळ पाडणारी गाणी आहेत. या चित्रपटाचे संगीतकार प्रकाश प्रभाकर आहेत तर गीतकार प्रणीत कुलकर्णी आणि अंकुश ठाकुर हे आहेत. या चित्रपटात अवधूत गुप्ते, बेला शेंडे, शाल्मली खोलगडे, जावेद अली, स्मिता, प्रकाश प्रभाकर या दिग्गजांनी गीते स्वरबद्ध केली आहेत. हा चित्रपट 10 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खूप दिवसानंतर प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा  चित्रपट पहायला मिळेल असा मानस निर्माते व दिग्दर्शक यांचा आहे.         हुंटाश चित्रपटाचा म्युझिक लॉचिंग सोहळा नुकताच प्रमुख पाहुणे आनंदराव अडसूळ (खासदार शिवसेना मुंबई), डॉ. अनंत कळसे (प्रधान सचिव विधान भवन महाराष्ट्र मुंबई) आणि चंद्रकुमार जजोदिया (प्रसिद्ध उद्योगपती मुंबई) यांच्या   उपस्थितीत दिमाखात पार पडला.