|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘आयएस’हस्तकाला मुंबईत अटक

‘आयएस’हस्तकाला मुंबईत अटक 

प्रतिनिधी/  मुंबई

देशासह संपूर्ण जगात घातकी कारवाया करणाऱया आयएसच्या अनेक देशात मुसक्या आवळल्या असतानाही त्यांच्या कारवाया सुरूच आहेत. अशातच देशात आयएसचे जाळे विणणाऱया, तसेच येथील दहशतवाद्यांसाठी आर्थिक फंड उभे करणाऱया आयएसचे सौदी अरेबिया कनेक्शन बरखास्त करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. राज्य एटीएसच्या मदतीने उत्तर प्रदेश एटीएसने सौदीत बसून आयएससाठी देशात घातकी कट आखणाऱया एका दहशतवाद्याला अटक केली आहे.

अबू जाहीद (42) असे या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याचे ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन त्याची रवानगी लवकरच लखनौला करण्यात येणार आहे. याआधी कोकणातील तबरेज तांबे हा तरुण सौदीमार्गे लिबिया आणि तेथून सीरियाला जाऊन आयएसला मिळाला होता. यामुळे तो अबूच्या संपर्कात होता का? याचा तपासही सुरू असल्याचे एटीएस अधिकाऱयानी सांगितले. उत्तर प्रदेश एटीएसने राज्य एटीएसच्या मदतीने एप्रिलमध्ये आयएस या संघटनेचे जाळे उद्ध्वस्त केले होते. यादरम्यान त्यांनी उमर, गाजीबाबा, फैजान आणि जकवान या चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता, हे चौघे अबू जाहीदच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. अबू हा आयएससाठी आर्थिक फंड आणि देशात घातपाती कारवाया करण्यासाठी तरुणांना चितावत होता. हे सर्व एका ऍपवरून एकमेकांच्या संपर्कातही होते. या सर्व माहितीनुसार उत्तर प्रदेश एटीएसने याची माहिती राज्य एटीएसला दिली होती. अबूविरोधात लुकआऊट नोटीसही काढली होती. अबू हा सौदीत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्यानंतर सौदी सरकार आणि येथील तपास यंत्रणांच्या मदतीने अबूला अटक केली. त्यानंतर त्याला प्रत्यार्पण करारानुसार देशात पाठविण्यात आले. उत्तर प्रदेश एटीएसने मुंबई विमानतळावर त्याला ताब्यात घेऊन येथील न्यायालयात हजर करून त्याचे ट्रान्झिस्ट रिमांड घेतले. 

Related posts: