|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » क्रिडा » वर्धन-बालाजी दुहेरीत विजेते

वर्धन-बालाजी दुहेरीत विजेते 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

75,000 डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या चीनमध्ये झालेल्या शेनझेन चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद भारताच्या विष्णूवर्धन आणि एन. श्रीराम बालाजी या जोडीने जिंकले.

दुहेरीच्या अंतिम सामन्यात विष्णूवर्धन आणि श्रीराम या जोडीने अमेरिकेच्या चौथ्या मानांकित ऑस्टीन क्रायसेक आणि जॅक्सन विथ्रो यांचा 7-6 (7-3), 7-6 (7-3) असा पराभव केला. विष्णूवर्धन आणि श्रीराम या जोडीने या स्पर्धेत प्रत्येकी 90 मानांकन गुण आणि 4650 डॉलर्सची कमाई केली. ऍस्टेना येथे झालेल्या स्पर्धेत वर्धन आणि बालाजी यांनी दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते.

Related posts: