|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वाशीनाका येथील स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग

वाशीनाका येथील स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग 

कळंबा / वार्ताहार

    कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपनगरामध्ये येणाऱया प्रभागामध्ये अपुऱया साफ सफाई कर्मचार्यांमुळे कचऱयाची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत आहे. प्रसंगी प्रभागात कर्मचाऱयांची संख्या कमी असल्याच्या कारणावरून प्रशासन अधिकारी आणि नगरसेवकांच्यात वादावादीचे प्रकार ही अनेक वेळा घडले आहेत.

      ही बाब लक्षात घेऊन वाशीनाका येथील नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचारी आणी स्थानिक नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्या सहकार्याने सामाजीक बांधीलकी जपत स्वतःचं प्रभागाची साफसफाईची मोहीम हाती घेतली. यावेळी प्रभागातील नागरिक महिलांसह लहान मुलांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला यावेळी प्रभागातील कचरा कोंडाळे, गटर्स, नाल्यांची साफ सफाई करण्यात आली.

     या स्वच्छता मोहिमेत स्वत: नगरसेवक अभिजित चव्हाण नागरिकांच्या सोबत सहभागी झाले होते. अपुऱया कर्मचाऱयांच्या संख्येमुळे प्रशासनाशी वाद घालत बसण्यापेक्षा नागरिकांच्या सहकार्याने प्रभागाची स्वच्छता करून अभिजीत चव्हाण यांनी इतर नगरसेवकांना एक आदर्शच घालून दिला आहे. या स्वच्छता मोहीमेत राधिका पाटील, स्मिता भुईबर, सुस्मिता पाटील, अनघा कुलकर्णी, वर्धा कांबळे, जितिक्षा काटाळे, स्मिता पाटील, लता पाटील, प्रीती गायकवाड, शुभांगी बुवा, रणजीत पाटील, प्रसाद काटाळे, सर्जेराव कांबळे, आनिल पाटील, दत्तात्रेय गायकवाड, गजानन पाटील, अरुण पाटील, सचिन कुलकर्णी आदींसह परीसरातील नागरीक सहभागी झाले होते.