|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जलयुक्त शिवारमुळे दुष्काळी भागात जलक्रांती : खा. संजकाका पाटील

जलयुक्त शिवारमुळे दुष्काळी भागात जलक्रांती : खा. संजकाका पाटील 

प्रतिनिधी/ जत

राज्यातील भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार ही महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेतून संबध महाराष्ट्रात मोठी कामे झाली, सांगली जिल्हयातील दुष्काळी भागातही ही कामे मोठय़ा प्रमाणात करण्यात आमच्या सरकारला यश आले. पण पाऊस झाल्याशिवाय त्याचे फलित दिसणार नव्हते. पण यंदा चांगला पाऊस झाल्याने ही कामे साकारलेल्या दुष्काळी भागात आता जलक्रांती दिसून येते आहे, असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.

जत तालुकयातील अंकलगी येथे शाळा इमारतीचे भूमीपूजन आणि जलयुक्त शिवारमधील सिंमेंट बंधाऱयात साठपा झालेल्या पाण्याचे पुजन खा. संययकाका यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार विलासराव जगताप, शिक्षण सभापती तम्मणगौडा रविपाटील, डॉ. रवींद्र आरळी, उमेशराव सावंत, विष्णू चव्हाण, श्रीदेवी जावीर, विजयकुमार चिप्पलगी, आर. के. पाटील, आय. एम. बिराजदार कृषी अधिकारी एम. एन. खुडे, बी. एस. गायकवाड, हलकुडे सावकर, सरपंच सविता तेली, काशिराय्या रेबगोंड, सिद्राम हत्तगणी, रमेश जत्ती, कुलांकाल तेली यांच्यासह पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही योजना राज्यात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून राबवली. या योजनेवर मोठा निधी देण्यात आला आहे. पाच वर्षात या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील टँकरयुक्त गावे टँकरमुक्त करणे, भूगर्भातील जलस्त्रोत समतोल पातळीत आणणे, तीत वाढ करणे, शेती, विहीरी, बोअर या जलस्त्रोतांनाही याचा फायदा होईल अशी ही योजना आहे.

आज सांगली जिल्हय़ात विशेषता दुष्काळी भागात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे या योजनेतुन झालेल्या कामाचे फलित आता दिसू लागले आहे. लोकांना ही कामे आवडली आहेत. त्यामुळे येणाऱया काळात आणखीन चांगला फायदा या योजनेचा होणार आहे.

जतसाठी वरदान : आ. जगताप

आमदार विलासराव जगताप म्हणाले, जलयुक्त शिवार ही जतसाठी वरदान ठरलेली योजना  आहे. या योजनेत मागच्या तीन वर्षात मोठय़ा प्रमाणात निधी खर्ची करण्यात आला आहे. सर्वच शासकीय विभागांनी जत तालुक्यातली कामे चांगली केली आहे. यंदा पाऊस चांगला झाला, यामुळे एक वेगळे चित्र जत तालुक्यात दिसत आहे. या योजनेवर आणखीन भर देण्याकडे आमचा प्रयत्न राहील. अधिकची गावे जलयुकत शिवारमध्ये समाविष्ट केली जातील. तसेच जलसंधारणासाठी राज्य शासनाचा खास निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

दरम्यान, अंकलगी गावालगत असणाऱया ओढय़ावर कृषी विभागाने एक सिमेंट बंधारा बांधला आहे. तसेच एका बंधाऱयाचे खुलीकरण केले आहे. यामुळे या भागात दोन किलोमीटर अंतरापर्यंत पाणी साचले आहे. या भागात पाणी चांगले मुरल्याने परिसरातील जमीनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. विहीरी,बोअरलाही याचा मोठा फायदा झाला आहे.

Related posts: