|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कांदळवन प्रकरणी नगराध्यक्षांकडून पुन्हा निराशा

कांदळवन प्रकरणी नगराध्यक्षांकडून पुन्हा निराशा 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरातील झाडगाव येथील रत्नाqिगरी नगर परिषदेच्या लघुद्योग एमआयडीसी परिसराच्या बाजूला असलेल्या खाडीत शासकीय आदेशांची पायमल्ली करत अनqिधिकृत डंपर, खडी वाळूच्या सहाय्याने भराव टाकण्यात येत आहे. या ठिकाणी जागा विकासकांनी अनधिकृतपणे भराव टाकला आहे. तसेच अनधिकृतपणे रस्ता बनवण्यात आला आहे. या ठिकाणी बेदरकारपणे पर्यावरणाची हानी करणात येत आहे. या बाबतची माहिती 1 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्वतः घटनास्थळी भेट देउढन घेतली व 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 या ठिकाणी मुख्याqिधिकारी व संबंqिधित qिवभागाचे अqिधिकारी स्वत: नगराध्यक्ष, सामाqिजक कार्यकर्ते नितीन सुर्वे यांच्यासह भेट देउढन चर्चा करण्याचे ठरले होते. याप्रमाणे गुरूवारी सकाळी नितीन सुर्वे, ‘तरूण भारत’चा प्रतिनिधी घटनास्थळी हजर होता, मात्र नगराध्यक्ष किंवा नगर परिषदेची कोणीही प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले नाहीत.

  कांदळवनाच्या कटाईबाबत वारंवार ‘तरूण भारत’मध्ये वृतांकन करण्यात येत असतानाही संबंधितांकडून या परिसरात जमीन विकसित करण्याचे काम सुरूच आहे. या बाबत नगर परिषद प्रशासनासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित येणारे महसूल विभागाकडूनही दखल घेतली गेली नाही. पर्यावरणाची होणारी हानी  टाळण्यासाठी प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई नगारिकांच्या चर्चेचा विषय होत आहे. गेले वर्षभर या परिसरात कांदळवनाची कटाई सुरू आहे. ‘तरूण भारत’ने या बाबतचे नियमित व परखडपणे वृतांकन करून नगर परिषदेसह शासनाच्या महसूल विभागाचा चाललेला संथ कारभार चव्हाटय़ावर आणला आहे.

 नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी 2 नोव्हेंबर सकाळी 9.30 वा. मुख्याधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, प्रभागातील नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन सुर्वे यांना घटनास्थळी प्राचारण केले, मात्र दिलेल्यावेळी घटनास्थळी ते किंवा त्यांचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. दिलेला शब्द नगराध्यांनी न पाळल्यामुळे त्यांच्या या बाबतच्या भूमिकेबद्दल संशयाचे वलय निर्माण झाल्याची भूमिका नितीन सुर्वे यांनी घेतली. झाडगाव लघुद्योग वसाहतीनजीकच्या रेखांकित करण्यात आलेल्या भूसंपादित केलेल्या जागेत संबंधित विकासकांकडून होणारी कांदळवनाची कटाई तसेच पर्यावरणाचे नुकसान करणाऱयांना नगर परिषद पाठीशी घालत असल्याचा आरोप नितीन सुर्वे यांनी केला आहे. या बाबत आपण अखेरपर्यंत लढा देऊन पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱयांच्या विरोधात न्यायालयाचेही दरवाजे खटखटवणार असल्याचे नितीन सुर्वे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.

।।।।।।।।।।।।,

 

Related posts: