|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » स्मार्ट सिटीसाठी ‘इमेजिन पणजी’ कंपनीची स्थापना

स्मार्ट सिटीसाठी ‘इमेजिन पणजी’ कंपनीची स्थापना 

प्रतिनिधी/ पणजी

पणजी स्मार्ट सिटीचे विविध प्रकल्प साकार करण्यासाठी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड या विशेष कपंनीची स्थापना करण्यात आली असून नगरविकास खात्याचे सचिव सुधीर महाजन हे त्या कपंनीचे प्रमुख आहेत. संचालक मंडळही नेमण्यात आले असून स्मार्ट सिटीचे प्रकल्प सदर कंपनी पूर्ण करणार आहे.

कपंनीवर एकूण 7 जणांचे संचालक मंडळ नेमण्यात आले असून त्यात खालील अधिकाऱयांचा समावेश आहे. वित्त सचिव दौलत हवालदार, नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव अशोक कुमार, पणजी महानगरपालिका आयुक्त अजित रॉय, सार्वजनिक बांधकाम खाते मुख्य अभियंता पी. के गुप्ता, नगरविकास खाते अवर सचिव पकंज कुमार, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर, सीईओ व्यवस्थापकीय संचालिका – पाल चौधरी.

 इमेजिन पणजी म्हणजे एक प्रकारे महामंडळच असून त्याचे प्रमुख म्हणजे अध्यक्ष या नात्याने सुधीर महाजन काम पाहतील. स्मार्ट सिटीकरिता गोवा राज्यातील पणजी शहराची निवड केंद्र सरकारने केली असून त्यासाठी विशेष कंपनीची नेमणूक (स्पेशल पर्पज वेहीकल) करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सर्व संबंधितांचा समावेश करून कंपनीची नेमणूक झाली असून स्मार्ट सिटीचे पूर्ण काम – प्रकल्प या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे.

पणजी स्मार्ट सिटी करण्यासाठी विविध प्रकल्प आखण्यात येणार असून त्याचे नियोजन सदर कंपनी करणार आहे. शिवाय त्याची मंजुरी, निधी, कार्यवाही अशी  सर्व प्रकारची कामे करण्याची जबाबदारी या कंपनीवरच सोपवण्यात आली आहे. पणजी मनपालाही या कंपनीत प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. शिवाय नगरविकास खातेही समाविष्ट करण्यात आले आहे.

 

 

 

Related posts: