|Monday, December 17, 2018
You are here: Home » Top News » भाजपा ‘वन मॅन आर्मी’च्या चक्रव्यूहात अडकली आहे : शत्रुघ्न सिन्हा

भाजपा ‘वन मॅन आर्मी’च्या चक्रव्यूहात अडकली आहे : शत्रुघ्न सिन्हा 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली  :

भाजपा तेव्हाच लोकांच्या अपेक्षांवर उतरू शकते जेव्हा ते ‘वन मॅन शो’ आणि ‘टू मॅन आर्मी’ च्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल,त्यामुळे सध्या भाजपा ‘वन मॅन आर्मी’च्या चक्रव्यूहात अडकली आहे, अस्sा वक्तव्य भाजपा खासदार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘मला वाटते आम्हाला गुजरात आणि हिमचाल प्रदेश या दोन्ही विधानसभा निवडणुकीत कडव्या आव्हानांचा सामना करवा लागणार आहे.कारण तरूण,शेतकरी आणि व्यापाऱयांमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांवरून नाराजी आहे. सिन्हा गेल्या महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे समर्थन करताना,देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.जेव्हा त्यांना भाजपा पक्ष सोडण्याचा विचार करत आहात का? असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘मी पक्ष सोडण्यासाठी भाजपा पक्षात सामील झालो नव्हतो. पण जेव्हा कधी मी बोलता sयाकडे दुर्लक्ष करू शकत नाही की, पक्ष ‘वन मॅन शो’ आणि ‘टू मॅन आर्मी होत चालला आहे.

 

Related posts: