|Sunday, May 19, 2019
You are here: Home » विविधा » मोबाईल – आधार कार्डशी लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा

मोबाईल – आधार कार्डशी लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

सिम कार्ड आधार नंबरशी लिंक करण्यासाठी 3 फेबुवारीची अंतिम तारिख देण्यात आली आहे.त्यामुळे तुम्ही तुमचे सिमकार्ड आधारशी लिंक केले नसेलतर त्वरित करून घ्या. आता मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी वन टाईम पासवर्ड (ओटीपी) आणि घरबसल्या सिम व्हेरिफिकेशन सुविधा सरकारकडून दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सिम कार्ड आधारशी लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा

  1. रि-व्हेरिफिकेशनसाठी 6 फेब्रुवारी 2018ची अंतिम तारिख देण्यात आली आहे.त्यानंतर तुमचे सिम कार्ड बंद होणार आहे.
  2. 1 डिसेंबरपासून ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी ओटीपीची सुविधा दिली जाणार असल्याची घोषणा युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटीने म्हणजेच आधार प्राधिकरणाने केली आहे. म्हणजेच तुम्ही मेसेज, आयव्हीआरएस कॉल किंवा मोबाईल ऍपच्या माध्यमातून लिकिंग रिक्वेस्ट पाठवू शकता. त्यामुळे तुम्हाला बायोमेट्रिक न देताही रि-व्हेरिफिकेशन करता येणार आहे.

3.ही प्रक्रिया ऑनलाईन करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला मेसेजवर ऑनलाईन लिंक करण्यासाठी एखादी लिंक आली तर त्यावर क्लिक करु नका.

4.तुमचा आधार नंबर आणि चालू मोबाईल नंबर नसेल तरीही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

  1. आजारी व्यक्ती, दिव्यांग आणि ज्ये÷ नागरिकांना ही प्रक्रिया पूर्ण करताना अडचण येऊ नये, किंवा त्यांच्या घरी जाऊन लिंकिंग करुन द्यावी, यासाठी दूरसंचार कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत.

6.या ग्राहकांसाठी अशी व्यवस्था करावी लागेल, ज्यामुळे त्यांना कोणतीही अडचण न येता प्रक्रिया पूर्ण होईल.

  1. एजंटकडून रि-व्हेरिफिकेशन केलं तर त्याला संपूर्ण ई-केवायसीची माहिती मिळू नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी दूरसंचार कंपनीची असेल.
  2. आधार आणि मोबाईल लिंकिंग मोफत असेल, तुम्हाला यासाठी पैसे देण्याची गरज नाही.
  3. एकापेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन असणाऱया व्यक्तींना वेगवेगळं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागेल.
  4. बनावट ओळखपत्र देऊन सिम खरेदी केलेल्या ग्राहकांना पकडण्यासाठी केंद्र सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

 

Related posts: