|Thursday, April 18, 2019
You are here: Home » उद्योग » जानेवारीत राज्यांची व्यवसाय सुलभता यादी

जानेवारीत राज्यांची व्यवसाय सुलभता यादी 

वृत्तसंस्था// नवी दिल्ली

जागतिक बँकेने व्यवसाय सुलभतेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताने उत्तम कामगिरी केली असून 30 स्थानाने सुधारणा झाली. आता केंद्र सरकारकडून राज्यांसाठी व्यवसाय सुलभीकरणाची यादी जाहीर करण्यात येणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून व्यवसाय सुलभतेची यादी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात येईल असे एका अधिकाऱयाने सांगितले.

सरकारकडून गेल्या वर्षी देश पातळीवर जाहीर करण्यात आलेल्या यादीत आंध्र प्रदेश आणि तेलंगना ही राज्य संयुक्तपणे पहिल्या स्थानी होती. विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि व्यवसायपूरक वातावरण सुधारण्यासाठी राज्यांमध्ये स्पर्धा करण्यासाठी ही यादी जाहीर करण्याचा सरकारचा हेतू आहे. राज्यांना सुधारणांविषयी प्रमाण अपलोड करण्याची मुदत मंगळवारपर्यंत वाढविण्यात येणार आहे. जानेवारी अथवा फेब्रुवारीपर्यंत हे मानांकन जारी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य सरकारे आपल्या भागात व्यवसाय सुलभ करण्यासाठी अनेक पावले उचलत आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येईल. राज्यांनी व्यवसायांना मंजुरी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षी मानांकनात 340 सुत्री व्यवसाय सुधारणा योजना आणि राज्यांनी केलेल्या प्रगतीनुसार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

बांधकाम परवाना, कर्मचारी कायदे, पर्यावरणीय नोंदणी, सूचना उद्योजकांपर्यंत पोहोचणे, जमिनीची उपलब्धता, एक खिडकी योजना यांच्या मानदंडाच्या आधारे यादी तयार करण्यात येते.

Related posts: