|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » येडगेवाडी बससेवा अखेर पूर्ववत

येडगेवाडी बससेवा अखेर पूर्ववत 

विद्यार्थ्यांच्या सोयीच्यासाठी एस.टी. विभागाचा निर्णय,

जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांचा पुढाकार

प्रतिनिधी /रत्नागिरी

संगमेश्वर-येडगेवाडी येथ बससेवे अभावी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागण्याच्या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमधून संताप व्यक्त होत होता. मात्र अखेर विद्यार्थी हित डोळय़ासमोर ठेवत जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिलेल्या सुचनेनुसार एस.टी प्रशासनाने कमी भारमान असतानाही येडगेवाडी बससेवा पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांसाठी आरवली-येडगेवाडी बस धावणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीतील विद्यार्थ्यांची एस. टी. च्या वेळापत्रकामुळे गैरसोय होत हाती. मात्र या 10 विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडणे शक्य नसल्याचे एस. टी. प्रशासनाचे म्हणणे होते. महाविद्यालयात जाण्यासाठी बसची सोय नसल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते.

मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भुमिका घेतली होती. या संदर्भात मंगळवारी बैठकही घेण्यात येणार होती. तत्पूर्वीच जिल्हाधिकारी यांनी या संपूर्ण प्रकरणाविषयी बारटक्के यांच्याशी चर्चा केली आणि अंतिम पर्याय म्हणून आरवलीतून एस.टी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही बस आरवलीतून सकाळी 8 वा. 10 मिनिटाला सुटेल व 9 वाजेपर्यंत येडगेवाडीला पोहोचेल आणि 10 वाजता कुंभारखाणी शाळेजवळ जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची कोणतीच गैरसोय होणार नाही. पूर्वी चिपळूण आगारातून सुटणारी चिपळूण-पाचांबे येडगेवाडी 7.45 वा.ची बस विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होती, मात्र ती बंद करून त्याऐवजी देवरूख आगाराची मिडी बस येडगेवाडीत सकाळी 7.30 वाजता पोहोचून परत हायस्कूलला 8.30 ला जाते. शाळेची वेळ 10.30 असल्याने विद्यार्थ्यांना नाहक दोन तास शाळेतच बसून रहावे लागत होते. मात्र सोमवारी येडगेवाडीचे मुलं शाळेत वेळेवर पोहोचली. पालक व शिक्षकांनी एसटी विभागाचे आभार मानले.

Related posts: