|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » मरे, जोकोव्हिक यांची मानांकनात घसरण

मरे, जोकोव्हिक यांची मानांकनात घसरण 

वृत्तसंस्था/ पॅरीस

सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या एटीपी पुरूष टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ब्रिटनचा अँडी मरे आणि सर्बियाचा जोकोव्हिक यांना पहिल्या 10 टेनिसपटूमध्ये स्थान मिळविता आले नाही. 30 वर्षीय मरे या मानांकन यादीत 16 व्या तर सर्बियाचा जोकोव्हिक 12 व्या स्थानावर आहे.

ब्रिटनच्या मरेला दुखापतीमुळे गेल्या जुलैपासून टेनिसपासून अलिप्त राहावे लागले आहे. या दुखापतीमुळे मरेचे मानांकनातील स्थान तिसऱया स्थानावरून 16 व्या स्थानावर घसरले आहे. 2014 च्या ऑक्टोबर नंतर मरेला या मानांकन यादीत पहिल्या 10 खेळाडूंत स्थान मिळविता आले नाही.

सर्बियाच्या जोकोव्हिकलाही दुखापतीने चांगलेच दमविले आहे. विंबल्डन स्पर्धेनंतर त्याला एकाही स्पर्धेत सहभागी होता आले नाही. 2017 च्या टेनिस हंगामाअखेर जोकोव्हिकला एटीपी मानांकन यादीत 12 व्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. मानांकनातील त्याचे स्थान पाच अंकांनी घसरले आहे. या ताज्या मानांकन यादीत स्पेनच्या राफेल नादालने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

एटीपी ताज्या मानांकन यादीत स्पेनचा नादाल 10645 गुणांसह पहिल्या, स्वित्झर्लंडचा फेडरर 9005 गुणांसह दुसऱया, जर्मनीचा अलेक्सझांडेर व्हेरेव्ह 4410 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रीयाचा थिम 3815 गुणांसह चौथ्या, क्रोएशियाचा सिलीक 3805 गुणांसह पाचव्या, बल्गेरियाचा डिमिंट्रोव्ह 3650 गुणांसह सहाव्या, स्वित्झर्लंडचा वावरिंका 3150 गुणांसह सातव्या, बेल्जियमचा गोफीन 2975 गुणांसह आठव्या, अमेरिकेचा सॉक 2765 गुणांसह नवव्या, स्पेनचा कॅरेनो 2615 गुणांसह दहाव्या, अर्जेंटिनाचा डेल पोट्रो 2595 गुणांसह 11 व्या, सर्बियाचा जोकोव्हिक 2585 गुणांसह 12 व्या, अमेरिकेचा क्वेरी 2535 गुणांसह 13 व्या, दक्षिण आफ्रिकेचा अँडरसन 2480 गुणांसह 14 व्या, फ्रान्सचा त्सोंगा 2320 गुणांसह 15 व्या, ब्रिटनचा मरे 2290 गुणांसह 16 व्या, अमेरिकेचा इस्नेर 2265 गुणांसह 17 व्या, फ्रान्सचा पौली 2235 गुणांसह 18 व्या, झेकचा बर्डीच 2095 गुणांसह 19 व्या आणि स्पेनचा बॉटिस्टा 2015 गुणांसह 20 व्या स्थानावर आहेत.

Related posts: