|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जारी होण्याच्या मार्गावर

बुध. दि. 8 ते  14 नोव्हेंबर 2017

जसे मनुष्याप्राण्याचे भविष्य असते तसेच राष्ट्राचेही असते. चालू वर्ष देशाला कसे असेल याची उत्कंठा प्रत्येकाला असतेच. माणसाच्या जशा राशी असतात. तशाच राशी देशाच्या असतात. त्यातही प्रत्येक शहर, गाव, तालुका, गल्ली यांच्याही राशी असतातच. हजारो वर्षात ज्या महत्त्वाच्या घटना घडतात. त्यांचा अनुभव पाहून या राशी ठरविलेल्या असतात. केवळ नावावरून एखाद्या गावची रास सांगणे चुकीचे ठरते. तसेच सामाजिक व राजकीय भविष्य वर्तविताना फार काळजी घ्यावी लागते. ज्याला हे जमत नाही त्याने सामाजिक भविष्याच्या मागे लागू नये हे योग्य ठरते. राष्ट्र व सामाजिक भविष्यालाच मेदिनीय ज्योतिष असे म्हणतात. निवडणुकीच्यावेळी अनेक मोठमोठे जोतिषी अमुक पक्ष येईल, या पक्षाला इतक्मया जागा त्या पक्षाला तितक्मया जागा मिळतील, लोकांच्या जिव्हाळय़ाचा हा प्रश्न इतक्मया कालावधीत सुटेल असे बोर्ड लावून ठेवत असतात. हा नेता सत्तेवर येईल तो पडेल असे छाती ठोकून सांगत असतात. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते. असे आतापर्यंत दिसून आलेले आहे. ज्यांना स्वत:चे भविष्य कळत नाही ते दोन चार पुस्तके वाचून अथवा 6 महिन्यांचा कोर्स करून पेपरात नावे छापून आणतात. काहीजण ज्योतिष कोर्सेस चालवितात.  पण यांना स्वत:चे प्रश्न सोडविता येत नाहीत ते इतरांचे काय सोडविणार असे  लोक खासगीत बोलत असतात. एका राजाला तू एका वर्षात मरणार व तुझे राज्य बुडणार असे राज ज्योतिषाने सांगितल्याने तो खंगत चालला. प्रधानाला ही गोष्ट समजताच त्या ज्योतिषाला दरबारात हजर करण्यास सांगितले. ज्योतिषी बुवा तुमचे सध्याचे वय किती व तुम्हाला आयुष्य किती आहे? ज्योतिषी म्हणतो सध्या माझे वय 51 वर्षे आहे व 88 वर्षापर्यंत मी निश्चित जगणार, हे ऐकताच प्रधानाने तलवार उपसली व त्या ज्योतिषाचा शिरच्छेद केला. 88 वर्षे जगणार असे म्हणणारा हा ज्योतिषी 51 क्या वषीच गेला याला आपले भविष्य समजले नाही तो राजाचे काय सांगणार. राजन आता तरी शहाणे व्हा व चिंता सोडा असे त्याने सांगताच राजा सुधारला व त्याने सर्व ज्योतिषाना बोलावून कडक उपाय योजून त्याना वठणीवर आणले अशी एक गोष्ट लहानपणी वाचली होती. ज्योतिषानी सर्व ग्रहांचा सांगोपांग विचार करून अंदाज वर्तवायचे असतात. खरे असो खोटे असो जे आहे ते स्पष्टपणे ग्रहांच्या आधारे त्यांना सांगता आले पाहिजे व ते सत्यात उतरले पाहिजे. माणूस श्रीमंत आहे की गरीब यावरून भविष्य सांगू नये ते नंतर अंगलट येते. अडलेले नडलेले लोक प्रश्न विचारायला येतात. त्यांना काही उपाय हवे असतात. जेथे सुईने काम होते तेथे दाभणाचा वापर करू नये, ज्योतिषशास्त्रात प्रत्येक समस्येला साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. महागडे उपाय कुणालाही सांगू नयेत. पण परिस्थिती वेगळीच दिसते व लोकानांही असे साधे सोपे सुद्धा उपाय सांगितल्यास पटत नाही. त्यांना मोठमोठय़ा शांती सांगितल्या अथवा एखादा मातीमोल खडा प्रचंड किंमत देऊन खरेदी केला, तरच समाधान वाटते. अशामुळेच हे शास्त्र बदनाम होत चालले आहे. जग बदलत चालले आहे. आज ना उद्या या शास्त्रावरही कायदेशीर बडगा उगारला जाईल अशी लक्षणे आताच दिसत आहेत. या परिस्थितीला कारणीभूत कोण याचा विचार करून हे शास्त्र बदलत्या काळानुसार अनुभवसिद्ध बनवले पाहिजे. तरच ते टिकेल व पूर्वीप्रमाणे याला राजाश्रयही प्राप्त होईल व या शास्त्रावर होणारी टीकाही टळेल.

मेष

गुरुचा उदय झाल्यामुळे खोळंबलेली कामे होऊ लागतील. यामुळे सर्व कामात दैवाची साथ मिळेल. काही विवाह व तत्सम शुभ कार्याची सुरुवात होईल. सरकारी कामात यश मिळेल. विवाह कार्यात अथवा वाटाघाटीत कल्पनेपेक्षा अधिक फायदा होईल. गुरु शुक्र युतीमुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात झालेली दिसेल.


वृषभ

गुरु अस्तामुळे महत्त्वाच्या कामांना खीळ बसली असेल तर ती दूर होईल. अडलेल्या बऱयाच कामांना गती मिळेल. दुरावलेले नातेवाईक पुन्हा जवळ येऊ लागतील. सर्व गैरसमज निवळतील. हाती पैसा खेळू लागेल. एखाद्या सरकारी कामातून मोठा लाभ होईल. परिस्थितीला शुभ कलाटणी मिळेल.


मिथुन

गुरुचा उदय झाल्यामुळे नोकरी व्यवसायातील अडलेली कामे होऊ लागतील. बदली अथवा हव्या त्या ठिकाणी पोस्टींग होऊ शकेल. आनंदी व समाधानी राहाल काही महत्त्वाचे फेरबदल या आठवडय़ात अपेक्षित आहेत जे तुमचे जीवन बदलून टाकतील. सर्व कामात हमखास यश देणारे ग्रहमान आहे.


कर्क

कार्यक्षमता चांगली शिस्तबद्धता व योग्य नियोजन असेल तर जीवनाचा जमाखर्च नीट ठेवाल. हा आठवडा तुम्हाला सर्व बाबतीत फार मोठे यश देऊ शकेल. अत्यंत अवघड व्यावहारिक कामे पूर्ण करू शकाल. शत्रूंचा त्रास कमी होत असल्याचे जाणवेल.


सिंह

गुरुचा उदय झालेला असल्याने आरोग्य विषयक गंभीर समस्या दूर होतील. तसेच आर्थिक व्यवहार सुरळीत होऊ लागतील. पंचम शनिकडे मात्र दुर्लक्ष करू नका. सहज एखाद्याजवळ काही तरी बोलला असाल तर त्याचा विपरीत  अर्थ काढला जाऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. भागीदारी व्यवसाय असेल तर भरभराटीचे योग.


कन्या

धनस्थानी गुरुचा उदय झालेला असल्याने आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल, पण पित्तप्रकृती असलेल्यांनी काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनातील किचकट समस्या सुटतील. एखादी बला कायमची टळेल. मोठा भागीदारी व्यवसाय असेल तर कायदेशीर बाबी योग्य ठेवा. भरभराटीचे योग.


तुळ

गजकेसरी योगाला उजळत्या गुरुची साथ लाभलेली आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. काही महत्त्वाच्या बाबतीत ठरवलेले बेत पार पाडतील. योग्य सल्ला देणारी माणसे भेटतील. चौफेर प्रगती पाहून काही काही जणांना पोटदुखी होण्याची शक्मयता आहे. काळजी घ्यावी. आरोग्य व वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडतील.


वृश्चिक

विवाह, प्रवास, वाटाघाटी व संततीच्या बाबतीत ग्रहमान चांगले आहे. संततीची चाहूल लागल्याने दत्तक वगैरेचा विचार रहीत कराल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने भाग्यशाली योग. बढती बदली होण्याची शक्मयता. आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. अपचन व पित्तविकारापासून जपावे लागेल.


धनु

राशीस्वामी गुरुचा उदय झालेला आहे. आर्थिक लाभाच्या अनेक संधी येतील. वास्तू संदर्भातील अडचणी दूर होतील. स्वत:चे वाहन होण्याच्या दृष्टीने चांगले योग. सरकारी कामे संततीचा भाग्योदय व शिक्षणात चांगले यश. आरोग्य तसेच कोर्टकचेऱयाच्या कामात चांगले यश मिळेल.


मकर

दशमात बलवान गुरु असल्याने जीवनाला शुभ कलाटणी मिळेल. अनाकलनीय गोष्टींचे गूढ उकलेल. वास्तु संदर्भातील कामात यश. धनलाभाच्या नवनव्या योजना आखाल. मूळ नक्षत्र व्यक्तींना जुन्या वस्तुच्या बदल्यात नव्या वस्तू घरी येतील. घराण्यातील पूर्वापार चालत आलेले वैरत्व संपुष्टात येईल तसे आणण्यासाठी प्रयत्न करा.


कुंभ

काही तरी करायला जावून नवा शोध लागावा, असे ग्रहमान आहे. वादावादी, मध्यस्थी व धाडसी कृत्यात चांगले यश मिळवाल. आर्थिकदृष्टय़ा अनुकूल वातावरण. दीर्घकाळ रखडलेली, जुनी वसूली होईल. संतती सौख्य व भाग्योदयाच्या दृष्टीने  शुभ फलदायक. गुरु उदय झाल्याने नोकरीव्यवसाय उद्योगात प्रगती सुरू होईल.


मीन

राशिस्वामी गुरुने मानसिक मरगळ झटकलेली आहे. त्यामुळे आर्थिक व्यावहारीक मानसिक व सामाजिक समस्या कमी होतील. नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालू लागेल. धनप्राप्तीचे योग. डोळय़ांच्या विकारांची शक्मयता, दूषित पाण्यापासून जपावे. कागदपत्रावर सही करताना बेसावध राहू नका काहीतरी गडबड होईल.