|Thursday, July 19, 2018
You are here: Home » उद्योग » पेट्रोल, डिझेल महागण्याची चिन्हे

पेट्रोल, डिझेल महागण्याची चिन्हे 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी पेट्रोल 11 पैसे आणि डिझेल 10 पैसे प्रतिलिटरने महाग झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप 59.61 डॉलर्सवर पोहोचल्या आहेत. रुपयांच्या भावात या किमती 3,849.43 रुपये प्रति पिंप आहे.

सोमवारी खनिज तेलाच्या किमती 3.5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जुलै 2015 च्या पातळीवर आता किमती पोहोचल्या आहेत. सौदी अरेबियाच्या राजपुत्राने सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा आणि भ्रष्टाचारविरोधी पावले उचलण्यात आल्याने तेलाच्या किमती वाढल्या आहेत. बेन्ट तेलाच्या किमती 3.5 टक्क्यांनी वाढत 64.27 डॉलर्सवर पोहोचली आहे. सामान्य नागरिकांकडून दबाव आल्याने गेल्या महिन्यात इंधनाच्या किमती 2 रुपये प्रतिलिटरने कमी करण्यात आल्या होत्या. सप्टेंबरमध्ये इंधनाची मागणी 9.9 टक्क्यांनी वाढली आहे. त्या महिन्यात 16.25 दशलक्ष टन पेट्रोलिय उत्पादनांची मागणी करण्यात आली होती.

Related posts: