|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माचीपेठेतील खुनप्रकरणी एकास अटक,दोघे फरारी

माचीपेठेतील खुनप्रकरणी एकास अटक,दोघे फरारी 

प्रतिनिधी/ सातारा

माचीपेठ येथील अदालत वाडय़ाच्या मागे सोमवारी सायंकाळी लक्ष्मण विठ्ठल माने या युवकाचा खून झाला होता. या खून प्रकरणी अजय धोंडिबा कोकरे या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. तर अद्याप दोघे संशयित फरारी आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून पूर्ववैमन्यासातून झाला असल्याचे समोर आले आहे.

सोमवारी दुपारी माने हा युवक तीन मित्रांसह अदालतवाडय़ामागील झाडीत पार्टीसाठी गेला होता. त्यावेळी जेवण तयार करताना या चौघांनीही मद्यपान केले होते. यावेळी मयत लक्ष्मण माने व त्याचा मित्र रोहित यामध्ये पुर्वीच्या वादातून भांडणे सुरू झाली. पूर्वी लक्ष्मण माने व रोहितच्या नातेवाईकांमध्ये भांडणे झाली होती. त्यावरून रोहित याने तू माझ्या नातेवाईकांशी का भांडलास असे म्हणुन पूर्वीच्या भांडणाचा राग धरून लक्ष्मण माने याच्याबरोबर भांडणे काढली व या भांडणाचे पर्यावसन मारामारीत झाले व डोक्यात दगड घालून लक्ष्मण माने याचा खून करण्यात आला.

  घटनेनंतर हे तीनही आरोपी फरार झाले होते. रात्री 8 वाजता पोलिसांना या खुनाच्या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन केले व नातेवाईकांकडे चौकेशी करून तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली. याप्रकरणी अजय धोंडिबा कोकरे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. अन्य दोन फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.