|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » नोटाबंदी वर्षपूर्ती : मोदींनी व्हिडिओ शेअर करून मानले आभार

नोटाबंदी वर्षपूर्ती : मोदींनी व्हिडिओ शेअर करून मानले आभार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात विरोधक काळादिवस साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचे फायदे सांगणारा व्हिडिओ शेअर करून विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभारही मानले आहेत.

मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय देशासाठी फायद्याचा की तोटय़ाचा यावर मतमतांतर आहेत.नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळल्याचे विरोधकांचा आरोप आहे. याचा निषेध म्हणून विरोधकांनी आज काळादिवस पाळण्याचे आवहन केले आहे. तर मोदींसह त्यांचा संपूर्ण सरकार नोटाबंदीचे जोरदार समर्थन करत आहे. त्यात मोदींनी शेअर केलेल्या व्हिडिओचाही समावेश आहे. नोटाबंदीच्या मुद्यावर मोदींनी आज एकूण चार ट्विट केले आहे.त्यात एका व्हिडिओचाही समावेश आहे.हा व्हिडिओ सात मिनिटे 13 सेकंदाचा एक माहितीपट आहे.नोटाबंदीचा निर्णय देशाच्या आर्थव्यवस्थेसाठी कसा फायद्याचा ठरला आहे, हे यातून आकडेवारीसह सांगण्यात आले आहे.

 

Related posts: