|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Top News » डीएसकेंचा अटकपूर्व जामीन न्यायलयाने फेटाळला

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन न्यायलयाने फेटाळला 

ऑनलाइन टीम / पुणे :

डीएसके कंपनीचे मालक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे,त्यामुळे डीएसकेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणात अटक टाळण्यासाठी डीएसके यांनी ऍड. श्रीकांत शिवदे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात शुक्रवारी अर्ज दाखल केला होता. या अंतरिम जामीनावर शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली. डीएसकेचा यांचा अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यन्त न्यायालयाने मंजूर केला असून, त्यावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला होता. परंतु आज झालेल्या सुनावणीत डिएकसेंचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांच्या पुणे व मुंबई येथील निवासस्थान आणि कार्यालयांवर छापा टाकून महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त केला आहे. या कागदपत्रांची, हार्डडिस्कची छाननी करत पोलिसांनी डीएसकेंच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. मुदतठेवीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखविल्याने डीएसकेंच्या विविध कंपनीत नागरिकांनी मोठया प्रमाणावर गुंतवणूक केली. ठेवीदारांना त्यांची मुद्दल अथवा व्याज परत मिळत नसल्याने त्यांनी डीएसकेंकडे पाठपुरावा करत पैशांची मागणी केली. मात्र, डीसकेंनी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे अद्याप परत न केल्याने पोलिसांनी डीएसकेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपासाकरिता एका विशेष पथकाची नियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी डीएसकेंनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

 

 

 

 

Related posts: