|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चित्रीतील जमीन उचंगी धरणग्रस्तांना देताना चित्री धरणग्रस्तांनी रोखले

चित्रीतील जमीन उचंगी धरणग्रस्तांना देताना चित्री धरणग्रस्तांनी रोखले 

चित्रीतील धरणग्रस्त, चित्रानगर, आवंडी,विटे, लाटगांव, रायवाड येथील धरणग्रस्

प्रतिनिधी/ आजरा

चित्री धरणाच्या खालील बाजूस असलेली जमीन उचंगी धरणग्रस्तांना देण्यासाठी गेलेले अधिकारी व उचंगी धरणग्रस्तांना चित्री धरणग्रस्तांन रोखले. चित्री धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन झालेले नाही, यामुळे या जमीनी आम्ही देणार नाही अशी भूमिका घेत चित्रीतील धरणग्रस्त असलेल्या चित्रानगर, आवंडी, विटे, लाटगांव, रायवाडा येथील धरणग्रस्तांनी विरोध केला. याबाबचे निवेदनही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांना देण्यात आले.

उचंगी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम रखडल्याने धरणाचे कामही रखडले आहे. चित्रीतील शिल्लक जमीन उचंगी धरणग्रस्तांना देऊन पुनर्वनसाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार दि. 8 रोजी उचंगी धरणग्रस्त व पाटबंधारे विभाग व महसूलचे अधिकारी चित्री धरणाच्या खालील बाजूस असलेली जमीन उचंगी धरणग्रस्तांना दाखविण्यासाठी व ताबा देण्यासाठी गेले होते. मात्र चित्री धरणग्रस्तांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडल्याचे चित्री धरणग्रस्त राजाराम चौगुले, रणजित सरदेसाई यांनी सांगितले.

चित्रीच्या धरणपायात व बुडीत क्षेत्रात आपल्या जमीनी गेल्या आहेत. संपादन पात्र जमीनीपेक्षा अधिक जमीन त्यावेळी शासनाने संपादीत केल्या. यामुळे काही लोक भूमीहीन झाले आहेत. धरणासाठी आजरा तालुक्यातील लाटगांव व विटे गावातील जमीनी गेल्या आहेत. तर धरणाच्या पाण्याचा लाभ आजरा तालुक्यातील मोजक्या गावांना व गडहिंग्लज तालुक्यातील बहुतांशी गावांना होत आहे. तर धरणासाठी ज्यांचे सर्वस्व उध्वस्त झाले त्यांना मात्र धरणाचे पाणी पाहत बसावे लागत आहे.

शासनाच्या धोरणानुसार चित्रीतील 104 खातेदारांना जमीनी वाटप झाल्या. मात्र एकाही खातेदाराला शासकीय खर्चाने पाणी दिले गेले नाही. चित्री धरणग्रस्तांना देण्यात आलेल्या सर्व जमीनी कोरडवाहू आहेत. पुनर्वसन कायद्यानुसार धरणग्रस्तांना दिलेल्या जमीनींना जोवर शासकीय खर्चाने पाणी दिले जात नाही तोवर चित्री धरणाच्या खालील बाजूस शिल्लक असलेल्या जमीनीतील एक इंचही जमीन कोणालाच वाटप करू देणार नाही असा इशारा चित्री धरणग्रस्तांनी दिला.

यावेळी मारूती लाड, अमृतराव सरदेसाई, मारूती चौगुले, सागर फगरे, प्रकाश लाड, शिवाजी पाटील, आबा पाटील, जयराम प्रभू, शांताबाई फगरे, शंकर प्रभू, उदय पाटील, अजय सरदेसाई, बबन बेहरे, प्रदीप पाटील यांच्यासह चित्रीतील धरणग्रस्त उपस्थित होते.

तांचा विरोध

Related posts: