|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » नफा कमाईने भांडवली बाजारात घसरण कायम

नफा कमाईने भांडवली बाजारात घसरण कायम 

बीएसईचा सेन्सेक्स 152, एनएसईचा निफ्टी 47 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

मंगळवारी बाजारात पडझड झाल्यानंतर बुधवारीही दबाव कायम होता. सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली तेजी आली होती, मात्र काही वेळातच नफा कमाई दिसून आली. निफ्टी दिवसभरात 10,384 आणि सेन्सेक्स 33,484 पर्यंत वधारला होता. दिवसातील उच्चांकावरून सेन्सेक्स 265 आणि निफ्टी 80 अंशाने घसरला.

बीएसईचा सेन्सेक्स 152 अंशाने घसरत 33,219 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 47 अंशाच्या कमजोरीने 10,303 वर स्थिरावला.

मिडकॅप, स्मॉलकॅप समभागात विक्रीचे वर्चस्व होते. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांनी घसरत 16,416 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.6 टक्क्यांनी कमजोर होत 19,363 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरत 17,498 पर्यंत पोहोचला.

बँकिंग, वाहन, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू समभागात विक्री झाल्याने बाजारात दबाव आला. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी घसरत 25,184 वर बंद झाला. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.7 टक्के आणि धातू निर्देशांक 1.4 टक्क्यांनी घसरला. बीएसइंचा ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.9 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 1.3 टक्के आणि ऊर्जा निर्देशांक 0.7 टक्क्यांनी कमजोर झाला. आयटी आणि औषध कंपन्यांच्या समभागात खरेदी झाली. निफ्टीचा औषध निर्देशांक 0.25 टक्के आणि आयटी निर्देशांक 0.7 टक्क्यांनी मजबूत झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

टेक महिंद्रा, ऍक्सिस बँक, एशियन पेन्ट्स, सिप्ला, सन फार्मा, बजाज ऑटो 4.1-1 टक्क्यांनी वधारले. वेदान्ता, भारती एअरटेल, भेल, टाटा मोटर्स, येस बँक, एसबीआय, ल्यूपिन 4.1-2.1 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात एम्फेसिस, जेएसडब्ल्यू एनर्जी, ग्लेक्सोस्मिथ कंझ्युमर, इंडियन बँक, वॉकहार्ट 3.5-2.6 टक्क्यांनी वधारले. रिलायन्स कॅपिटल, नाल्को, कॅस्ट्रॉल इंडिया, एम ऍण्ड एम फायनान्शियल, सेल 5.9-2.9 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात मधुकॉप प्रोजेक्ट्स, टीमलीज सर्व्हिसेज, आशापूरा माईन्स, न्यूक्लियस सॉफ्टवेअर, टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक्स 16.1-6.7 टक्क्यांनी वधारले. एलेकॉन इंजीनियरिंग, एस्ट्रा मायक्रोवेव्ह, एसटीएस इंडिया, जीएनएफसी, एमएमटीसी 13.8-10 टक्क्यांनी घसरले.

Related posts: