|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कारची रिक्षाला धडक, आठ शालेय विद्यार्थी जखमी

कारची रिक्षाला धडक, आठ शालेय विद्यार्थी जखमी 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

रूईकर कॉलनीतील प्रणव मंदिर चौकात गुरूवारी सकाळी रिक्षा आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षा उलटल्याने रिक्षातील आठ विद्यार्थी आणि रिक्षाचालक असे 9 जण जखमी झाले. दरम्यान, संतप्त जमावाने कारची मोडतोड करत चालकाला बेदम चोप दिला. दोन्ही वाहनांचे मिळून सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. .

रूईकर कॉलनीतील टॉवर उद्यानाकडून दहा शालेय विद्यार्थ्यांना घेऊन रिक्षा (एम.एच.09 सीडब्ल्यु 294) शिवाजी तरूण मंडळाकडे निघाली होती. यावेळी उड्डाणपुलमार्गे रूईकर कॉलनीतील प्रणव चौकात कार (एम.एच.09 डीएम 4488) येत होती. रिक्षा आणि कार शिवाजी मंडळाच्या चौकात एकाच दिशेला वळल्याने या दोन्ही वाहनांची धडक झाली. कारच्या धडकेत रिक्षा उलटली. त्यामुळे रिक्षातील शालेय विद्यार्थी घाबरले. या अपघातात रिक्षाचालक सागर एकनाथ बाबर (वय 29, रा. कदमवाडी), विद्यार्थी दिनेश युवराज माने (वय 6, रा. कावळा नाका), विनायक मनिष कोरवी (वय 9, रा. कावळा नाका), पार्थ वसंत कमदगी (वय 9, रा. कावळा नाका), प्रज्वला विजय जोंधळे (वय 7, रा. कावळा नाका), सिद्दीकी परशुराम कुचकोरवी (वय 6, रा. कावळा नाका), विद्या मनोज कुचकोरवी (वय 6, रा. कावळा नाका), आयान अहमद पठाण (वय 6, रा. नागाळा पार्क) जखमी झाले.

Related posts: