|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » डीएसकेंना हायकोर्टाचा दिलासा; आठवडय़ाभरासाठी  अंतरिम जामीन मंजूर

डीएसकेंना हायकोर्टाचा दिलासा; आठवडय़ाभरासाठी  अंतरिम जामीन मंजूर 

ऑनलाइन टीम / पुणे :

डीएसके कंपनीचे मालक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना हायकोर्टाने एका आठवडय़ासाठी अंतरिम जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे

डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला, याप्रकरणात अटक टाळण्यासाठी डीएसके यांनी ऍड. श्रीकांत शिवदे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात शुक्रवारी अर्ज दाखल केला होता. या अंतरिम जामीनावर शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली. डीएसके यांचा अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यन्त न्यायालयाने मंजूर केला होता मात्र त्यानंतर झालेल्या सुनावणीत डिएकसेंचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. आता हायकोर्टाने डिएसकेंना आठवडय़ाच्या आत सर्व व्यवहार पूर्ण करता आले तर पहा,नाहीतर ठोस प्रपोजल घेऊन जामिनासाठी उभे राहण्यासाठी सांगितले आहे.त्यामुळे डिसकेंना पुन्हा तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

 

 

 

Related posts: