|Friday, November 10, 2017
You are here: Home » Automobiles » रॉयल एनफील्डच्या दोन दमदार बाईक लाँच

रॉयल एनफील्डच्या दोन दमदार बाईक लाँच 

ऑनलाइन टीम / मुंबई :

रॉयल एनफील्डने दोन दमदार बाईक लाँच केल्या आहे. इटलीच्या मिलानमध्ये मोटार शो दरम्यान या दोन बाईक लाँच करण्यात आल्या आहेत. रॉयल एनफिल्ड इंटर आयएनटी 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 ट्विन सादर करण्यात आल्या आहे.

पॉवर बाईक क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने 650सीसीचे नव इंजिन आणले आहे.या बाईक सर्वात आधी युरोपमध्ये लाँच केली जाणार आहे.तर 2018च्या जून-जूलै महिन्यात या बाईक भारतात लाँच करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही बाईकचा लूक अतिशय शानदार आहे.या दोन्ही बाईक पाहून इंटरसेप्टर मार्कची आठवण होते.मात्र दोन्ही बाईकमध्ये फक्त पाच टक्केच समानता आहे.नव्या इंजिनाबाबत रॉयल एनफील्डचे सीईओ सिद्धार्थ लाल यांनी सांगितले की,‘हे दमदार इंजिन 7500 आरपीएमपर्यंत जाते.यामुळे बाईकचा वेग प्रतितास 130 ते 140 किमीपर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो’

 

 

Related posts: