|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » Top News » पीडितेची मदत 10 लाखांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ; पंकजा मुंडे यांची माहिती

पीडितेची मदत 10 लाखांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ; पंकजा मुंडे यांची माहिती 

पुणे / प्रतिनिधी :

गँगरेप आणि अत्याचारासारख्या गंभीर घटनेनंतर पीडित महिलेला सरकारकडून देण्यात येणारी 3 लाख रुपयांची मदत अपुरी आहे. त्यामुळेच ही मदत आता 10 लाखांपर्यंत करावी, असा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्रीदेखील सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय होईल, असे सूतोवाच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

याबाबत मुंडे म्हणाल्या, गँडरेप, सिरिअस इंज्युरी, अत्याचारासारख्या घटनेनंतर पीडित महिलेला सरकारकडून सध्या 3 लाखांची मदत देण्यात येते. परंतु, ही मदत खूपच अपुरी आहे. याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच ही रक्कम वाढवून 10 लाखांपर्यंत करावी, असा प्रस्ताव मी वित्त विभागाला पाठविलेला आहे. मुख्यमंत्रीदेखील याबाबत सकारात्मक आहेत. अशा महिलांना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागविण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. अनाथ आणि बेघरगृहात सुविधा नसतानाही नुसतीच आकडेवारी दाखवून सरकारकडून मदत मिळविली जात असल्यास अशा गृहांची तपास करून अशांवर कारवाई करू. प्रसंगी ती बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Related posts: