|Monday, April 23, 2018
You are here: Home » Top News » नारायण राणे मंत्री होणार ; गिरीश बापटांचे संकेत

नारायण राणे मंत्री होणार ; गिरीश बापटांचे संकेत 

ऑनलाईन टीम / नाशिक :

‘स्वाभिमान महाराष्ट्र’चे अध्यक्ष नारायण राणे मंत्री होणार असल्याचे संकेत अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिले. राणे मंत्री म्हणून येणार आणि सरकार अस्थिर होणार नाही, असे ते म्हणाले.

नाशिक येथे ते बोलत होते. बापट म्हणाले, “कोणी या किंवा जा” आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. आमचे सरकार स्थिर आणि नेतृत्व खमके आहे. युतीमध्ये सगळे ठीक असल्याचे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना काही अडचण असली तर ते मुख्यमंत्र्यांशी बोलतात.

मागील कर्जमाफीचे पैसे 18 महिन्यांनी मिळाले होते. फालतू लोकांनी पैसे लाटू नये ही आमची इच्छा म्हणून कर्जमाफीला उशीर झाला, असे गिरीश बापट यांनी कर्जमाफीसंदर्भात सांगितले.

Related posts: