|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अनिकेत कोथळेच्या मृतदेहाचे मिरजेत शवविच्छेदन

अनिकेत कोथळेच्या मृतदेहाचे मिरजेत शवविच्छेदन 

प्रतिनिधी/ मिरज

पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोली घाटातून गुरूवारी रात्री उशीरा मिरज शासकीय रूग्णालयात आणण्यात आला. तेथे त्रिसदस्यीय डॉक्टरांच्या पथकाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

   अनिकेत कोथळेचा सांगली येथे पोलीस कोठडीत मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तो पळून गेल्याचा बनाव करीत त्याचा मृतदेह आंबोली येथे नेऊन तो दोनवेळा जाळण्याचा प्रयत्न केला होता. नातेवाईक आणि नागरिकांच्या आक्रोशानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली. पाच पोलीसांना अटक करण्यात आली. दरम्यान, गुरूवारी अनिकेत कोथळेचा मृतदेह आंबोली घाटातून वर काढण्यात आला. रात्री उशिरा तो मिरज शासकीय रूग्णालयात आणण्यात आला. यावेळी नागरिकांचा संभाव्य राग पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनास प्रारंभ झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन तीन डॉक्टरांच्या पथकाने केले. दुपारी उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू होते. यावेळी अनिकेत कोथळेचे नातेवाईक उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मृतदेहाची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Related posts: