|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » भविष्य » राशीभविष्य

राशीभविष्य 

12 ते 18 नोव्हेंबर 2017

मेष

 वृश्चिकेत सूर्य प्रवेश व चंद्र-गुरु लाभयोग होत आहे. महत्त्वाची कामे करण्याची जिद्द ठेवा. धावपळ होईल. तुम्हाला विरोध  झाला तरी त्याला तोंड देता येईल. राजकीय- सामाजिक कार्यात युक्तिवाद व बुद्धिवाद वापरा, कार्याची दिशा ठरवा. धंद्यात किरकोळ अडचणी येतील. गोड बोलून काम करून घ्या. संसारात जीवनसाथी, मुलांचे सहकार्य मिळेल. कोर्टकेसमध्ये आशा वाढेल. शिक्षणात मार्ग मिळेल.


वृषभ

कठीण  कामात मेहनत करूनही यश दूर पळण्याची शक्मयता असते. वृश्चिकेत सूर्य व चंद्र, मंगळ युती होत आहे. धंद्यातील कामे होतील. महत्त्वाची कागदपत्रे सप्ताहाच्या शेवटी गहाळ होण्याची शक्मयता आहे. राजकीय, सामाजिक कार्यात मैत्री करणाऱयाबरोबर सावधपणे बोला. प्रेमात व संसारात वाद होईल. जवळच्या व्यक्तीला दुखावले जाईल, असे कृत्य टाळा. मैत्रीत दुरावा येईल. कोर्टाच्या कामात साक्षीदार फिरण्याचे शक्मयता आहे. विद्यार्थ्यांनी आळस केल्यास नुकसान होईल.


मिथुन

 या सप्ताहात तुमचा उत्साह व मनशक्ती याचा उपयोग होईल. प्रयत्नाने यश मिळवाल. धंद्यात काम मिळवा. गोडी गुलाबीने कामगार वर्गाला सांभाळा. नोकरीत काम वाढेल. वृश्चिकेत सूर्य प्रवेश व शुक्र गुरु युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कोर्टाच्या कामात तत्परता दाखवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. विरोधानेच माणूस कणखर होतो यश मिळवतो. जीवनसाथीला खूष ठेवता येईल. खरेदी होईल.


कर्क

तुमच्या कार्यात सर्वांचे सहकार्य मिळू शकेल. वृश्चिकेत सूर्य प्रवेश व चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. वाटाघाटीने प्रश्न सोडवता येईल. धंदा वाढेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. जास्त विश्वास दुसऱयावर टाकणे ठीक नाही. राजकीय, सामाजिक कार्यात कामाचा व्याप वाढला तरी प्रति÷ा मिळेल. थकबाकी वसूल करा. संसारात मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. शिक्षणात परिश्रम घ्या. शेतकरी वर्गाने तत्परता ठेवून काम करावे व निर्णय घ्यावा.


सिंह

वृश्चिकेत सूर्य प्रवेश व चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. तुमची लोकप्रियता वाढलेली पाहून विरोधक गुप्त कारवाया करण्याचा प्रयत्न करतील. राजकीय, सामाजिक कार्यात जास्त मेहनत घ्यावी लागेल. लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करा. कला क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. लोकांचे प्रेम मिळेल. अविवाहितांनी लग्नासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थी वर्गाला यश खेचता येईल. नम्रतेने वागावे. कोर्टकेसमध्ये मार्ग मिळेल. शेतकरी प्रगतीच्या दिशेने जाईल.


कन्या

रविवार, सोमवार तुमचा राग अनावर येईल.  कामात येणाऱया अडचणी कटकटीच्या वाटतील. वृश्चिकेत सूर्य व शुक्र गुरु युती होत आहे. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. थोरा- मोठय़ांचा सहवास व मदत मिळेल. थकबाकी वसूल करा. नवीन परिचय होईल. उत्पन्न वाढेल. कला क्रीडा क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी मिळेल. परदेशी जाण्याचा योग येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. बुद्धिचातुर्यावर बोलले जाईल. परीक्षेसाठी तयारी होईल. आळस नको.


तुळ

वृश्चिकेत सूर्यप्रवेश व गुरु व शुक्र युती होत आहे. तुम्हाला साथ आहे ग्रहांची तेव्हा कोणतेही क्षेत्र असले तरी तुम्ही प्रयत्न करा. यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. शेअर्सचा अंदाज गुरुवार, शुक्रवार बरोबर येईल. राजकीय, सामाजिक कार्यात मंगळवार, बुधवार उतावळेपणा करू नका. संसारात मनाप्रमाणे घटना घडतील. अविवाहितांना लग्नाचा प्रयत्न करता येईल. कला क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. शिक्षणात प्रगती होईल. शेतकरी वर्गाला दिशा मिळेल.


वृश्चिक

तुमच्या राशीत सूर्य प्रवेश व चंद्र, मंगळ युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. संसारात अडचणी येतील. वाद होईल. सर्वांच्या विचाराने कोणताही निर्णय घ्या. स्वत:ची काळजी घ्या. व्यसनाने नुकसान होईल. धंद्यात सुधारणा करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोड करावी लागेल. खर्च वाढेल, विद्यार्थी वर्गाने अभ्यासात जास्त लक्ष द्यावे. राजकारणात  मेहनतीनेच यश मिळेल.


धनु

तुमचा उत्साह वाढेल. वृश्चिकेत सूर्य प्रवेश व शुक्र, गुरु युती होत आहे. महत्त्वाची कामे मात्र आठवडय़ात करा. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. सहवास मिळेल. धंद्यात अंदाज चुकेल. सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात चुका टाळण्याचा प्रयत्न करा. वरि÷ांना दुखवू नका. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ धंद्यात ठेवा. आळसाने नुकसान होईल. लग्नासाठी प्रयत्न करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबात जबाबदारी घ्यावी लागेल.


मकर

साडेसती सुरू आहे. प्रगतीची संधी तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मिळेल. प्रयत्न करा. रविवार, सोमवार धावाधावा करावी लागेल. तणाव होईल. संयम ठेवा. मंगळवारपासून समस्या कमी होईल. संसारात सुखाचे क्षण येतील. धंद्यात वाढ करता येईल. राजकीय- सामाजिक कार्यात प्रभाव व लोकप्रियता वाढेल. नोकरीची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. प्रेमाला चालना मिळेल.


कुंभ

वृश्चिकेत सूर्य प्रवेश व चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. तुम्हाला तुमच्या प्रगतीपासून कोणी रोखू शकणार नाही. प्रवासात मंगळवार, बुधवार सावध रहा. दगदग होईल. धंद्यात नवा फंडा उपयुक्त ठरेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. राजकीय- सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. योजना मार्गी लावता येईल. प्रेमाला चालना मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. विशेष काम करता येईल. शेतकरी वर्गाला यश मिळेल.


मीन

वृश्चिकेत होणारे सूर्याचे राश्यांतर तुमच्या समस्या हळूहळू कमी करणार आहे. या आठवडय़ात तडजोड करावी लागेल. अडचणी येतील. नातेसंबंध सांभाळावे लागतील. धंद्यात सुधारणा होऊ शकेल. कोर्टकेसमध्ये चिंता वाढू शकते. राजकीय- सामाजिक कार्यात प्रयत्न करा. काम करा, यशाची फारशी अपेक्षा ठेवू नका. प्रति÷ा टिकवण्यास कष्ट होतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासातच लक्ष द्यावे. व्यसनाने नुकसान होईल.

Related posts: