|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलिया-होंडुरास लढत बरोबरीत

ऑस्ट्रेलिया-होंडुरास लढत बरोबरीत 

वृत्तसंस्था /सॅन पेदो सुला

2018 फिफा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पात्रतेच्या समीप पोहचला आहे. शुक्रवारी येथे झालेल्या आशिया-कोन्सासेफ प्लेऑफ सामन्यात होंडुरासने ऑस्ट्रेलियाला गोलशून्य बरोबरीत रोखले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने आपले अधिक वर्चस्व राखले. पण त्यांचा हुकमी स्ट्रायकर टॉमी ज्युरिकने गोल करण्याच्या दोन संधी वाया घालविल्या. आता ऑस्ट्रेलियन संघ दुसऱया टप्प्यातील सामना खेळण्यासाठी मायदेशी परतणार असून हा सामना येत्या बुधवारी होईल. फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत सलग चौथ्यांदा सहभागाच्या दिशेने ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न चालू आहेत.