|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » क्रिडा » ऍशेसपेक्षाही भारत-पाक लढती अधिक रोमांचक : अक्रम

ऍशेसपेक्षाही भारत-पाक लढती अधिक रोमांचक : अक्रम 

वृत्तसंस्था/ कराची

‘इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेपेक्षाही भारत-पाकिस्तान यांच्यातील लढती अधिक रोमांचक असतात आणि क्रिकेट जगतातील बहुतांशी प्रेक्षकांना हा थरार अनुभवणेच अधिक पसंत असते. पण, सध्याच्या घडीला गर्भश्रीमंत बीसीसीसीआयसमोर आयसीसीचे काहीही चालत नाही, हेच दिसून आले असून यामुळे दोन्ही संघातील लढतींचे प्रमाण घटले आहे’, असे प्रतिपादन पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज व कर्णधार वासिम अक्रमने केले. खेळ व राजकारण यांची गफलत करता कामा नये, असेही तो याप्रसंगी म्हणाला.

‘इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिका केवळ 2 कोटी लोक पाहतात तर भारत-पाकिस्तान यांच्यातील लढती मात्र अब्जावधी लोक पाहतात’, असा दावा 51 वर्षीय अक्रमने पुढे केला. यापूर्वी, 2014 मध्ये बीसीसीआय व पीसीबी यांनी 2015 ते 2023 या 6 वर्षांच्या कालावधीत 6 द्विपक्षीय मालिका खेळण्याचा करार केला होता. पण, दोन्ही संघातील तणावाची स्थिती पाहता यातील एकाही मालिकेची अद्याप रुपरेषा देखील आखली गेलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर अक्रम बोलत होता. दोन्ही संघ यापूर्वी, यंदा जून महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने भिडले, त्यावेळी सर्फराज खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने विराट कोहलीच्या भारतीय संघाला थोडय़ाथोडक्या नव्हे तर 180 धावांनी चारीमुंडय़ा चीत केले होते.

ऍशेसपूर्व सराव सामन्यात इंग्लंड 192 धावांनी विजयी

ऍडलेड ओव्हल : इंग्लंडने ऍशेसपूर्व सराव सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादशचा डाव अवघ्या 75 धावांमध्येच खुर्दा करत 192 धावांनी मोठा विजय मिळवण्याचा पराक्रम गाजवला. ख्रिस वोक्सने 17 धावात 4 तर जिम्मी अँडरसन व क्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. ही लढत गुलाबी चेंडूने खेळवली गेली.

ऍडलेड ओव्हलवर इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी केवळ 30 मिनिटांचा खेळ पुरेसा ठरला. ओव्हर्टनने (3-15) पहिल्याच षटकात मॅट शार्टचा 28 धावांवर त्रिफळा उडवला तर अनुभवी जलद गोलंदाज अँडरसनने शेवटचे 2 बळी घेत 12 धावात 3 बळी, असे पृथ्थकरण नोंदवले. इंग्लंडने या लढतीत पहिल्या डावात 293 धावांवर धावा जमवल्या तर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 9 बाद 233 धावांवर घोषित केला. नंतर इंग्लंडचा डाव 207 धावांवर आटोपल्यानंतर स्थानिक संघासमोर 268 धावांचे आव्हान होते.

Related posts: