|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » तिसऱया दिवसअखेर रेल्वे 5 बाद 330

तिसऱया दिवसअखेर रेल्वे 5 बाद 330 

पुणे / प्रतिनिधी

महाराष्ट्राने उभारलेल्या 481 धावांचा पाठलाग करताना रेल्वेने तिसऱया दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 330 धावा केल्या. रेल्वेला अजूनही 151 धावांची गरज आहे.

पुण्यातील गहुंजे मैदानावर या दोन संघांमध्ये रणजी ट्रॉफीची लढत सुरु आहे. तिसऱया दिवशी बिनबाद 88 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केल्यावर पाच धावांची भर पडल्यावर सौरभ वाकसकरला खुरानाने पायचित केले. त्याने 33 धावा केल्या. त्यानंतर शुक्ला आणि प्रथम सिंगने रेल्वेला शंभरी गाठून दिली. 125 धावा झाल्या असताना शुक्ला बाद झाला. त्याला प्रदीप डाढेने बाद केले. यानंतर प्रथम सिंग आणि नितीन भिल्लेने 107 धावांची भागीदारी करत रेल्वेचा डाव सावरला. रेल्वेच्या 232 धावा असताना नितीन भिल्ले बाद झाला. त्याला मुकेश चौधरीने बाद केले. त्यानंतर लगेचच प्रथम सिंग आणि महेश रावतही माघारी परतले. अरिंदम घोष आणि मनीष राव यांनी आणखी पडझड न होता दिवसअखेरपर्यंत संघाचा डाव 5 बाद 330 धावांपर्यंत पोहोचवला. या दोघांमध्ये 44 धावांची भागीदारी झाली. रेल्वेला अजूनही 151 धावांची गरज आहे. एकूणच रेल्वेच्या फलंदाजांनी तिसऱया दिवशी संथ खेळ केला. महाराष्ट्राकडून चिराग खुरानाने 50 धावा देत 2 बळी घेतले. तर निकित धुमाळ, मुकेश चौधरी, प्रदीप दाढे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Related posts: